Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परमेश्वराने त्यांच्यात भ्रांतवृत्ती घातली आहे; मद्यपी वांती करीत लोळतो तसे त्यांनी मिसर देशाला त्याच्या प्रत्येक कामात बहकवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परमेश्वराने त्यांच्यामध्ये विकृतीचा आत्मा मिसळला आहे आणि जसा मद्यपी आपल्या ओकारीत लटपटत चालतो तसे त्यांनी सर्व कामात जे तिने केले, मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 याहवेहनी त्यांच्यामध्ये भोंवळ येण्याचा आत्मा ओतला आहे; त्यामुळे इजिप्तच्या सर्व कामात ती लटपटते, जसा मद्यपी, त्याने केलेल्या ओकारी भोवती फिरतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:14
20 Iomraidhean Croise  

तर पाहा, परमेश्वराने तुझ्या ह्या संदेष्ट्यांच्या मुखात असत्य वदवणारा आत्मा संचरवला आहे; तुझे अनिष्ट होणार असे परमेश्वर बोलला आहे.”


सामर्थ्य व चातुर्य ही त्याला आहेत; भ्रांत होणारा व भ्रांत करणारा हे त्याच्या सत्तेत आहेत.


त्यांचा प्रकाश नाहीसा होऊन ते अंधकारात चाचपडत असतात. तो त्यांना मद्यप्यांसारखे झोकांडे खायला लावतो.”


मनुष्याची प्रशंसा त्याच्या सुज्ञतेप्रमाणे होते, पण ज्याचे हृदय कुटिल असते त्याचा तिरस्कार होतो.


मी मिसर्‍यांवर मिसरी उठवीन; प्रत्येक आपल्या भावाबरोबर व प्रत्येक आपल्या शेजार्‍याबरोबर, नगर नगराशी, राज्य राज्याशी लढेल.


भूमी मद्यप्यासारखी झोकांड्या खात आहे, माचाळासारखी झुलत आहे; तिच्या अपराधांचा भार तिला दाबत आहे; ती पडेल, आणि पुन्हा उठणार नाही.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


माझ्या लोकांविषयी म्हणाल तर पोरे त्यांना पिडतात; स्त्रिया त्यांच्यावर अधिकार चालवतात. हे माझ्या प्रजे, तुझे नेते तुला बहकवतात; त्यांनी तुझ्या जाण्याच्या वाटा बुजवून टाकल्या आहेत.


ह्या लोकांचे नेते त्यांना बहकवणारे झाले आहेत; व त्यांचे अनुगामी ग्रासून टाकण्यात आले आहेत.


“तू त्यांना सांग, ‘सेनाधीश परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो : मी तुमच्यामध्ये तलवार पाठवतो म्हणून प्या, मस्त व्हा, वांती करा, पडा, पुन्हा उठू नका.’


त्याला बेहोश करा, कारण त्याने परमेश्वराविरुद्ध बढाई मारली आहे; मवाब आपल्या वांतीत लोळेल, तो हास्यविषय होईल.


तेव्हा येशूने उत्तर दिले, “अरेरे, हे विश्वासहीन व कुटिल पिढी! मी कोठवर तुमच्याबरोबर राहावे? कोठवर तुमचे सोसावे? त्याला येथे माझ्याजवळ आणा.”


त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्या ठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो;


त्यानंतर देवाने अबीमलेख व शखेमकर ह्यांच्यामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा दुरात्मा पाठवला आणि शखेमकर अबीमलेखाशी कपटाने वागू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan