Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत, नोफाचे सरदार फसले आहेत; जे तिच्या गोत्राची कोनशिला असे आहेत त्यांनी मिसराला चुकीच्या मार्गाने नेले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:13
14 Iomraidhean Croise  

सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निवळ मूर्ख बनले आहेत; त्यांची मसलत पशूच्या समान झाली आहे; “मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे” असे तुम्ही फारोला कसे म्हणता?


नोफ व तहपन्हेस ह्यांच्या लोकांनी तुला खाऊन टाकले आहे.


जे यहूदी मिसर देशात, म्हणजे मिग्दोल, तहपन्हेस, नोफ व पथ्रोस प्रांत ह्यांत वस्ती करून होते त्यांच्याविषयी यिर्मयाला जे वचन प्राप्त झाले ते हे :


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


मिसरनिवासिनी कन्ये, बंदिवासात जाण्यासाठी सामग्री तयार कर; कारण नोफ उजाड होईल, जळून निर्जन होईल.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


मी पथ्रोस उजाड करीन, सोअनास आग लावीन, नो ह्याला न्यायदंड करीन.


मी मिसरास आग लावीन; सीन वेणा देईल; नो छिन्नभिन्न होईल, नोफावर तर भरदिवसा वैरी उठतील.


कारण पाहा, विध्वंस झाल्यामुळे ते निघून गेले आहेत; मिसर त्यांना गोळा करील, मोफ त्यांना मूठमाती देईल; काटेकुसळे त्यांच्या रुपेरी मौल्यवान पदार्थांचा ताबा घेतील, त्यांच्या तंबूत काटेरी झुडपे रुजतील.


त्याच्यापासूनच कोनशिला, त्याच्यापासूनच खुंटी, त्याच्यापासूनच युद्धधनुष्य, त्याच्यापासूनच प्रत्येक अधिकारी निघतो.


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


स्वतःला शहाणे म्हणता म्हणता ते मूर्ख बनले;


म्हणून तुम्हा विश्वास ठेवणार्‍यांना ती मूल्यवान आहे; परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना, “बांधणार्‍यांनी नापसंत केलेला धोंडा तोच कोनशिला झाला,”


शौल म्हणाला, “लोकनायकहो, इकडे या; आज कोणत्या प्रकारे हे पातक झाले आहे ह्याचा शोध करून पाहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan