Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 सोअनाचे सरदार, फारोचे शहाणे मंत्री निवळ मूर्ख बनले आहेत; त्यांची मसलत पशूच्या समान झाली आहे; “मी शहाण्यांचा पुत्र आहे, मी प्राचीन राजांचा वंशज आहे” असे तुम्ही फारोला कसे म्हणता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सोअनाचे सरदार पूर्णपणे मूर्ख आहेत. फारोचे शहाणे सल्लागार बुद्धिहीन झाले आहेत. तुम्ही फारोला कसे म्हणू शकता, मी ज्ञानाचा मुलगा, प्राचीन काळच्या राजाचा मुलगा आहे?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सोअन येथील अधिकारी निरुपयोगीच नाहीत तर मूर्ख आहेत; फारोह राजाचे शहाणे सल्लागार निरर्थक सल्ला देतात. तुम्ही फारोहला कसे म्हणू शकता, “ज्ञानी लोकांपैकी एक मी आहे, प्राचीन राजांचा मी एक शिष्य आहे?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:11
31 Iomraidhean Croise  

शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते.


शलमोनाला लागली तेवढी गंधसरूची व देवदारूची लाकडे हीरामाने पुरवली.


तो राजमंत्र्यांना अनवाणी घेऊन जातो; तो न्यायाधीशांना मूढ ठरवतो.


राष्ट्रांच्या मसलती परमेश्वर निरर्थक करतो; लोकांचे संकल्प निष्फळ करतो.


मी तर मूढ व अज्ञानी होतो; तुझ्यापुढे मी पशुवत होतो.


मिसर देशात सोअनाच्या पटांगणावर त्यांच्या वडिलांसमक्ष त्याने अद्भुत कृत्ये केली.


त्याने मिसर देशात आपली चिन्हे, सोअनाच्या पटांगणावर आपली अद्भुत कृत्ये दाखवली, तो दिवस त्यांनी आठवला नाही.


पशुतुल्य मनुष्याला कळत नाही, मूर्खाला समजत नाही की,


लोकांनी ते गोळा करून त्यांचे ढीग केले, तेव्हा सर्व जमिनीवर घाण सुटली.


तुझ्या व तुझ्या लोकांच्या, आणि तुझ्या सर्व सेवकांच्या अंगांवर बेडूक चढतील.”’


मला मनुष्य म्हणू नये इतका मी मूढ आहे, मनुष्यात समज असतो तो माझ्यात नाही.


सोअनाचे सरदार मूर्ख बनले आहेत; नोफाचे सरदार फसले आहेत; मिसरी गोत्रांची कोनशिला असे जे, त्यांनी मिसराला बहकवले आहे.


मिसराच्या अंगची हिंमत खचेल; त्याची मसलत मी व्यर्थ करीन; ते मूर्तींना, मांत्रिकांना, भूतवैद्यांना व गारुड्यांना प्रश्‍न विचारतील.


तर पाहा, मी ह्या लोकांशी अद्भुत प्रकारे वर्तण्यास प्रवृत्त होतो; मी अद्भुत व आश्‍चर्यकारक कृत्य करीन, तेव्हा त्यांच्यातील ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट होईल, त्यांच्यातील बुद्धिमानांची बुद्धी लुप्त होईल.”


त्याचे (यहूदाचे) सरदार सोअनात दाखल झाले आहेत व त्याचे वकील हानेसाला पोहचले आहेत.


खोट्या संदेष्ट्यांची चिन्हे खोटी करणारा, दैवज्ञांना वेडे ठरवणारा, ज्ञानी लोकांना मागे सारून त्यांचे ज्ञान मूर्खत्व ठरवणारा मी आहे.


प्रत्येक मनुष्य पशुतुल्य व ज्ञानशून्य झाला आहे; प्रत्येक मूर्तिकार मूर्तीमुळे लज्जित झाला आहे; कारण त्याने ओतलेली मूर्ती साक्षात लबाडी आहे, त्यांच्यात मुळीच प्राण नाही.


कारण मेंढपाळ पशुतुल्य झाले आहेत; ते परमेश्वराच्या शोधास लागले नाहीत म्हणून त्यांची कार्यसिद्धी झाली नाही. त्यांचा सर्व कळप विखरून गेला आहे.


ते तेथे ओरडले की, ‘मिसर देशाचा राजा फारो म्हणजे पोकळ गर्जनाच होय; नेमलेली वेळ त्याने दवडली.’


अदोमाविषयी : सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “तेमानात आता शहाणपण उरले नाही ना? समंजसांचे शहाणपण लयास गेले ना? त्यांचे सर्व शहाणपण संपले ना?


शहाणे लज्जित होतात, त्यांची त्रेधा उडून ते पकडले जातात; पाहा, परमेश्वराचे वचन ते धिक्कारतात; त्यांच्यात शहाणपण कोठचे असणार!


तुझ्या सौंदर्याच्या अभिमानाने तुझे हृदय उन्मत्त झाले, तुझ्या वैभवाने तुझी बुद्धी भ्रष्ट झाली; मी तुला भूमीवर आदळले, राजांनी तुझा तमाशा पाहावा म्हणून त्यांच्यापुढे तुला टाकले.


मी पथ्रोस उजाड करीन, सोअनास आग लावीन, नो ह्याला न्यायदंड करीन.


नाशावर नाश येईल, अवईवर अवई उठेल; ते संदेष्ट्यांना दृष्टान्त पाहायला सांगतील, पण याजकांचे नियमशास्त्रज्ञान व वडिलांचे मसलत देण्याचे सामर्थ्य ही नष्ट होतील.


तुझ्याबरोबर करारमदार केलेल्यांनी तुला सीमेवर लावून दिले आहे; तुझ्याबरोबर सल्ला केलेल्यांनी तुला फसवले आहे, ते तुझ्यावर प्रबल झाले आहेत. तुझे अन्न खाणार्‍यांनी तुझ्यासाठी जाळे पसरले आहे; अदोमात समज मुळीच नाही.


मी अदोमातून सुज्ञ पुरुष नाहीतसे करीन, एसावाच्या पहाडातून बुद्धी नाहीशी करीन, असे त्या काळी नाही का घडणार, असे परमेश्वर म्हणतो.


ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते.


मोशेला मिसरी लोकांच्या सर्व विद्यांचे शिक्षण मिळाले आणि तो भाषणात व कृतीत पराक्रमी होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan