Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 19:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 मिसराविषयी घोषणा. पाहा, परमेश्वर, वेगवान मेघावर स्वार होऊन मिसराकडे येत आहे; मिसराच्या मूर्ती त्याच्यापुढे थरथरतील आणि मिसऱ्यांचे हृदय आतल्या आत वितळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 इजिप्तविरुद्ध भविष्यवाणी: पाहा, याहवेह वेगवान ढगावर स्वार होऊन इजिप्तला येत आहेत. इजिप्तच्या मूर्ती त्यांच्यापुढे थरथर कापतात, आणि इजिप्तच्या लोकांची अंतःकरणे भीतीने वितळून जातात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 19:1
36 Iomraidhean Croise  

आपल्या माड्यांच्या तुळया जलांच्या ठायी बसवतोस, मेघांना आपला रथ करतोस, वायूच्या पंखांवर आरोहण करून जातोस,


मी केलेले त्याचे मनन त्याला गोड वाटो; परमेश्वराच्या ठायी मला हर्ष होईल.


आकाश लववून तो खाली उतरला; त्याच्या पायांखाली निबिड अंधकार होता.


देवाला गीत गा, त्याच्या नावाचे स्तवन करा; ज्याची स्वारी ओसाड प्रदेशातून चालली आहे, त्याच्यासाठी राजमार्ग तयार करा; त्याचे नाव परमेश आहे, त्याच्यापुढे आनंदोत्सव करा.


कारण ह्या रात्री मिसर देशात फिरून त्यातील मनुष्य व पशू ह्या सर्वांचे प्रथमजन्मलेले मी मारून टाकीन आणि मिसर देशातील सर्व देवांचे शासन करीन; मी परमेश्वर आहे.


बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :


ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


तर पाहा, पायदळ, जोडीजोडीने चालणारे घोडेस्वार येत आहेत; ते उच्च स्वराने म्हणतात, बाबेल पडला हो पडला; त्याच्या देवांच्या सर्व मूर्ती जमिनीवर आपटून फोडल्या.”


मिसर देशाचा राजा फारो, त्याचे सेवक, त्याचे सरदार व त्याचे सर्व लोक ह्यांना,


पाहा, ढगांप्रमाणे तो येत आहे, त्याचे रथ वादळाप्रमाणे आहेत; त्याचे घोडे गरुडांपेक्षा वेगवान आहेत. आम्ही हायहाय करणार, आमचे वाटोळे झाले आहे!


कारण तुम्ही ज्या मिसर देशात काही दिवस राहण्यास गेला आहात त्यात अन्य देवांना धूप जाळल्यामुळे तुम्ही आपला उच्छेद करून घ्याल व पृथ्वीवरच्या सर्व राष्ट्रांत शापास व अप्रतिष्ठेस पात्र व्हाल.


“राष्ट्रांमध्ये हे विदित करा व प्रसिद्ध करा, ध्वज उभारा; प्रसिद्ध करा, लपवून ठेवू नका आणि म्हणा : ‘बाबेल घेतला आहे, बेल फजीत झाला आहे, मरोदख भग्न झाला आहे; त्याच्या मूर्तींची फजिती झाली आहे, त्याचे पुतळे भग्न झाले आहेत.’


मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.


प्रभू परमेश्वर म्हणतो, मी नोफातील दैवतांचा उच्छेद करीन, मूर्ती नाहीतशा करीन आणि मिसर देशातला कोणीही ह्यापुढे अधिपती होणार नाही असे करीन; मिसर देश दहशतीने भरीन.


मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहूदाच्या वंशजांवर बलात्कार केला.”


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


परमेश्वर मंदक्रोध व महापराक्रमी आहे; तरी तो पाप्यांना शासन केल्यावाचून राहणार नाही; परमेश्वर वादळात व तुफानात चालतो, मेघ त्याच्या चरणांची धूळ आहेत.


तो संकटसमुद्रातून पार जाऊन समुद्रलहरींना दबकावील; नील नदीचे सर्व गहिरे पाणी सुकून जाईल. अश्शूराचा गर्व उतरेल, मिसरचे राजवेत्र निघून जाईल.


तसेच मिसराचे घराणे वर चढून गेले नाही, तर त्यांच्यावरही पर्जन्यवृष्टी होणार नाही; जी राष्ट्रे मंडपांचा सण पाळण्यासाठी वर चढून जाणार नाहीत त्या सर्व राष्ट्रांवर परमेश्वर जी मरी पाठवणार ती ह्यांच्यावरही येईल.


त्या वेळी मिसरी लोक परमेश्वराने ठार केलेल्या आपल्या ज्येष्ठ पुत्रांना मूठमाती देत होते; त्यांच्या देवांनाही परमेश्वराने शासन केले होते.


हे यशुरूना, देवासमान कोणी नाही, तो तुझ्या साहाय्यासाठी मेघमंडळावर आरूढ होऊन आपल्या प्रतापाने आकाशमार्गाने धाव घेतो.


हे ऐकताच आमच्या काळजाचे पाणीपाणी झाले आणि तुमच्या भीतीमुळे कोणाच्या जिवात जीव राहिला नाही; कारण तुमचा देव परमेश्वर हाच वर स्वर्गात व खाली पृथ्वीवर देव आहे.


ते यहोशवाला म्हणाले, “हा सर्व देश परमेश्वराने आपल्या हाती नक्कीच दिला आहे; शिवाय, आपल्या भीतीमुळे ह्या देशाच्या सर्व रहिवाशांची गाळण उडाली आहे.”


आणि त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हांला दिला आहे. आम्हांला तुमची दहशत बसली आहे, आणि देशातील सर्व रहिवाशांची तुमच्या भीतीने गाळण उडाली आहे, हे मला ठाऊक आहे;


‘पाहा, तो मेघांसहित येतो;’ प्रत्येक डोळा त्याला ‘पाहील’, ज्यांनी त्याला ‘भोसकले तेही पाहतील; आणि पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे ऊर बडवून घेतील.’ असेच होणार. आमेन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan