Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 18:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वराने मला सांगितले की : “सूर्य प्रकाशत असता स्वच्छ ऊन पडते व कापणीच्या समयी उष्णकाळी दहिवरयुक्त अभ्र येते, तसा मी शांत राहून आपल्या निवासस्थानातून अवलोकन करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वराने मला हे सांगितले आहे की, जसे सूर्याच्या प्रकाशात उकळणारी उष्णता असते अथवा जसे कापणीच्या उन्हात दहिवरयुक्त अभ्र येते, तसे मी आपल्या निवासस्थानातून शांतपणे निरीक्षण करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याहवेह मला असे म्हणतात: “मी शांत राहीन आणि माझ्या निवासस्थानातून पाहीन, सूर्यप्रकाशामध्ये चमकणाऱ्या उष्णतेसारखे, दव असलेले ढग कापणीच्या उन्हात असल्यासारखे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 18:4
17 Iomraidhean Croise  

सूर्योदयीच्या प्रभातेसारखा तो उदय पावेल, निरभ्र प्रभातेसारखा तो असेल, पर्जन्यवृष्टीनंतर सूर्यप्रकाशाने जमिनीतून हिरवळ उगवते तसा तो उगवेल.


तुझ्या सेवकाच्या विनवणीकडे आणि तुझे लोक इस्राएल ह्या स्थानाकडे तोंड करून विनवणी करतील तिच्याकडे तू कान दे; स्वर्गातील तुझ्या निवासस्थानातून तू ती श्रवण कर आणि श्रवण करून त्यांना क्षमा कर.


कापलेल्या गवतावर पडणार्‍या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणार्‍या सरींप्रमाणे तो उतरो.


राजाचा कोप सिंहाच्या गर्जनेसारखा आहे; त्याची प्रसन्नता गवतावर पडलेल्या दहिवरासारखी आहे.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”


त्या वेळेस उंच बांध्याचे व तुळतुळीत अंगाचे लोक, मुळापासून भयंकर, हुकूमत चालवणारे, पादाक्रांत करणारे, ज्या राष्ट्राची भूमी नद्यांनी विभागलेली आहे, त्या लोकांकडून सेनाधीश परमेश्वराचे नाम दिलेल्या स्थळी म्हणजे सीयोन डोंगरावर सेनाधीश परमेश्वराला नजराणे अर्पण करण्यात येतील.1


तुझे मृत जिवंत होतील, माझ्या (लोकांची) प्रेते उठतील. मातीस मिळालेल्यांनो जागृत व्हा, गजर करा; कारण तुझ्यावरील दहिवर, हे प्रभातीचे जीवनदायी दहिवर आहे; भूमी प्रेते बाहेर टाकील.


कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीवरील रहिवाशांना त्यांच्या पापास्तव शासन करण्यास आपल्या स्थानाहून निघाला आहे. शोषलेले रक्त पृथ्वी प्रकट करील, वधलेल्यांना ती ह्यापुढे झाकून ठेवणार नाही.


त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.


मी आपला न्याय जवळ आणत आहे, आता तो दूर नाही; माझ्याकडून होणार्‍या उद्धारास विलंब लागणार नाही; मी सीयोनेत उद्धार स्थापतो, इस्राएलास माझे गौरव देतो.”


कारण जो उच्च, परमथोर आहे, जो अक्षय स्थितीत वास करतो, ज्याचे नाम पवित्र प्रभू आहे, तो असे म्हणतो : “मी उच्च व पवित्रस्थानी वसतो, तसाच ज्याचे चित्त अनुतापयुक्त व नम्र आहे त्याच्या ठायीही मी वसतो; येणेकरून नम्र जनांच्या आत्म्याचे मी संजीवन करतो व अनुतापी जनांचे हृदय उत्तेजित करतो.


मी इस्राएलास दहिवरासारखा होईन; तो भूकमलाप्रमाणे फुलेल, लबानोनाप्रमाणे मूळ धरील.


ते आपल्या दोषाचे फळ भोगून माझ्या दर्शनाविषयी उत्सुक होईपर्यंत मी आपल्या स्थानी जाऊन राहीन; ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील :


“सीयोनेवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे हे तुम्हांला कळेल, तेव्हा यरुशलेम पवित्र स्थळ होईल; ह्यापुढे परके त्यातून येणार-जाणार नाहीत.


प्रभू परमेश्वर आपले रहस्य आपले सेवक संदेष्टे ह्यांना कळवल्याशिवाय खरोखर काहीच करत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan