Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 त्या दिवशी इस्राएलाच्या भीतीस्तव सोडून दिलेल्या व उद्ध्वस्त झालेल्या वनातील आणि डोंगराच्या माथ्यावरील स्थलांप्रमाणे त्याची तटबंदीची नगरे होतील; ती उजाड होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्या दिवसात त्यांची बळकट नगरे डोंगराच्या माथ्यावरील वनराईच्या उतारावर सोडलेल्या ठिकाणांसारखी, जी ठिकाणे इस्राएल लोकांच्यामुळे त्यांनी सोडली होती त्यासारखी होतील, आणि तेथे ती ओस पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्या दिवशी त्यांची आश्रयस्थान असलेली शहरे, जी त्यांनी इस्राएली लोकांमुळे सोडली होती, ती आता काटेरी झाडे आणि झुडपे वाढत असलेल्या ठिकाणांसारखी होतील. ती सर्व उजाड होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:9
16 Iomraidhean Croise  

कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस;


आपल्या हातांनी बनवलेल्या वेद्यांकडे तो पाहणार नाही; आपल्या बोटांनी घडलेल्या अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती ह्यांकडे तो पाहणार नाही.


तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


इसहाकाची उच्च स्थाने ओसाड होतील, इस्राएलाच्या पवित्र स्थानांची नासधूस होईल, आणि मी तलवार घेऊन यराबामाच्या घराण्यावर उठेन.”


तुझ्या देशातील नगरांचा विध्वंस करीन, तुझे सर्व दुर्ग पाडून टाकीन;


अम्रीचे कायदे तुम्ही पाळता, अहाबाच्या घराण्याच्या चालीरीती तुम्ही पाळता, व त्यांच्या तत्त्वांप्रमाणे तुम्ही चालता, म्हणून तुमचा नाश होईल, त्याच्या रहिवाशांची निर्भर्त्सना होईल असे मी करीन; माझ्या लोकांची अप्रतिष्ठा तुम्हांला सोसावी लागेल.”


तथापि देश, आपल्या रहिवाशांमुळे, त्यांच्या कृत्यांच्या फळामुळे वैराण होईल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan