Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्या दिवशी मनुष्य आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहील; त्याचे डोळे इस्राएलाच्या पवित्र प्रभूकडे लागतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्या दिवशी लोक आपल्या उत्पन्नकर्त्याकडे पाहतील आणि त्यांचे डोळे इस्राएलाच्या एका पवित्र प्रभूकडे लागतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्या दिवशी लोक त्यांच्या निर्माणकर्त्याकडे पाहतील त्यांची दृष्टी इस्राएलच्या पवित्र परमेश्वराकडे वळवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:7
21 Iomraidhean Croise  

त्यांनी इकडेतिकडे पाहिले तरी त्यांना सोडवायला कोणी नव्हता; त्यांनी परमेश्वराचा धावा केला, तरी त्याने त्यांचे ऐकले नाही.


हे सर्व आटोपल्यावर तेथे हजर असलेल्या सर्व इस्राएलांनी यहूदाच्या नगरानगरांतून जाऊन यहूदा, बन्यामीन, एफ्राईम व मनश्शे ह्या प्रांतात असलेले मूर्तिस्तंभ मोडून टाकले, अशेरा मूर्ती फोडून टाकल्या आणि उच्च स्थाने व वेद्या मोडून फोडून टाकल्या; त्यांचा सर्वस्वी विध्वंस केला. मग सर्व इस्राएल लोक आपापल्या गावी आपापल्या वतनात गेले. याजक आणि लेवी ह्यांच्यासाठी हिज्कीया तरतूद करतो


याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची उपासना करू, त्याला नमन करू.


परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यांना बरे करील.


जुन्या तळ्याच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींच्या मध्ये हौद केला; पण ज्याने हे सर्व केले त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही; ज्याने हे पूर्वीच योजले त्याच्याकडे तुम्ही दृष्टी लावली नाही.


भ्रांत मनाचे लोक सुज्ञान पावतील व कुरकुर करणारे नीतिशिक्षण घेतील.”


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्‍यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”


मी तर परमेश्वराची मार्गप्रतीक्षा करीन. मी आपल्या तारण करणार्‍या देवाची वाट पाहत राहीन; माझा देव माझे ऐकेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan