Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 तरी जैतून झाड हलवले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, वरच्या फांदीवर दोनतीन व त्याच्या अगदी बाहेर पसरलेल्या बहुफल शाखांवर चारपाच राहतात, तसा त्यांचा शेष राहील, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 जसे जेव्हा जैतून झाड हलविले असता त्यावर काही फळे शिल्लक राहतात, दोन किंवा तीन फळे सर्वाहून उंच शेंड्यावर राहतात, चार किंवा पाच त्याच्या उंचावरच्या फलदायी फांद्यावर राहतात, असे परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 जसे जैतुनाच्या झाडाला झोडपतात तेव्हा उंचटोकाच्या फांद्यांवर दोन किंवा तीन जैतून, आणि फळ देणाऱ्या मोठ्या फांद्यांवर चार किंवा पाच जैतून राहून जातात, तसे जमा करण्याचे काही शिल्लक राहील,” असे इस्राएलचे परमेश्वर याहवेह घोषित करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:6
16 Iomraidhean Croise  

तरीपण इस्राएलातील ज्या सात हजारांनी बआलमूर्तींपुढे गुडघे टेकले नाहीत व ज्या प्रत्येकाने मुखाने त्याचे चुंबन घेतले नाही, त्यांना मी वाचवीन.”


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


कारण हे इस्राएला, तुझे लोक समुद्राच्या रेतीइतके असले तरी त्यांचा अवशेष मात्र परत येईल; न्यायाने परिपूर्ण असा प्रलय नेमला आहे.


जैतून वृक्ष हलवल्यावर, द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर, सरवा वेचताना जशी थोडीशी फळे राहतात तसे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल.


त्या दिवशी असे होईल की फरात नदाच्या प्रवाहापासून तो मिसरी ओहोळापर्यंत परमेश्वर मळणी करील, आणि इस्राएल लोकांनो, तुम्हांला एकएक असे वेचतील.


परमेश्वर म्हणतो, “सर्व देश उजाड होईल; पण मी त्याचा पुरा अंत करणार नाही.


मी आपले मुख ह्यापुढे त्यांच्यापासून लपवणार नाही; कारण मी आपल्या आत्म्याची इस्राएल घराण्यावर वृष्टी केली आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.”


तुझ्यावर चोर आले, रात्री लुटारू आले, तर त्यांना हवे तेवढेच ते घेतील, नाही काय? द्राक्षे खुडणारे तुझ्याकडे आले, तर ते सरवा नाही का ठेवणार? पण तुझी तर किती नासाडी झाली आहे!


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


ह्या रीतीने सर्व इस्राएल लोकांचे तारण होईल; शास्त्रात असे लिहिलेले आहे, “मुक्त करणारा सीयोनेतून येईल; तो याकोबापासून अभक्ती दूर करील;”


यशयाही इस्राएलाविषयी असे पुकारतो की, “जरी इस्राएल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली, तरी अवशेष मात्र तारण पावेल;


परमेश्वर तुम्हांला इतर राष्ट्रांत विखरील; ज्या ज्या राष्ट्रात परमेश्वर तुम्हांला घालवील तेथे तुमची संख्या अल्प राहील.


तो त्यांना म्हणाला, “आता तुम्ही केले त्या मानाने मी काय केले? एफ्राइमाच्या द्राक्षांचा सरवा हा अबियेजेराच्या द्राक्षांच्या सबंध पिकापेक्षा चांगला नाही काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan