Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्या दिवसात असे होईल की, याकोबाचे वैभव विरळ होईल आणि त्याचा पुष्ट देह सडपातळ होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 “त्या दिवशी याकोबाचे वैभव कमी होईल; त्याच्या शरीरातील चरबी व्यर्थ जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:4
15 Iomraidhean Croise  

पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या.


अश्शूरचा राजा शल्मनेसर हा त्याच्यावर चढाई करून आला; होशे त्याचा अंकित झाला व त्याने त्याला खंडणी दिली.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


पारिपत्याच्या दिवशी व दुरून नाशकारक वादळ येईल तेव्हा काय कराल? तुम्ही साहाय्यार्थ कोणाकडे धाव घ्याल? आपले ऐश्वर्य कोठे ठेवून जाल?


बंदिवानांच्या पायांशी दबून राहणे व वध झालेल्यांच्या खाली पडून राहणे ह्यांशिवाय त्यांना दुसरी गती नाही. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


जैतून वृक्ष हलवल्यावर, द्राक्षांचा हंगाम आटोपल्यावर, सरवा वेचताना जशी थोडीशी फळे राहतात तसे पृथ्वीवरील राष्ट्रांचे होईल.


नीतिमानाची प्रतिष्ठा होवो अशी गीते दिगंतापासून आमच्या कानी पडली. तेव्हा मी म्हणालो, “माझा नाश झाला हो नाश झाला! हायहाय! ठकांनी ठकवले, ठकांनी ठकबाजीने ठकवले.”


मनश्शे एफ्राइमाला खातो, आणि एफ्राईम मनश्शेला खातो; ते दोघे मिळून यहूदाला विरोध करतात. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


प्रभूने याकोबाला संदेश पाठवला असून तो इस्राएलाच्या ठायी प्रविष्ट झाला आहे.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर त्यांना म्हणतो, पाहा, मी, मीच पुष्ट पशू व रोड पशू ह्यांमध्ये निवाडा करीन.


परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्‍यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”


परमेश्वर त्यांना भयावह होईल; पृथ्वीवरच्या सर्व दैवतांचा तो क्षय करील; तेव्हा सर्व राष्ट्रद्वीपे व प्रत्येक जण आपापल्या स्थानी त्याला भजेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan