Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एफ्राइमापासून तटबंदीची नगरे नाहीशी होतील. दिमिष्कापासून त्याचे राज्य आणि अरामाचा अवशेष ही नाहीसे होतील, ही इस्राएल लोकांच्या गौरवासारखी होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तटबंदी केलेले शहर एफ्राईमपासून नाहीसे होईल, आणि दिमिष्कमधून शाही सामर्थ्य नाहीसे होईल; अराम नगरातील अवशिष्ट इस्राएली लोकांच्या वैभवासारखे असतील,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:3
27 Iomraidhean Croise  

त्याचे मागणे मान्य करून अश्शूराच्या राजाने दिमिष्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकांना पाडाव करून कीर येथे नेले; आणि रसीन ह्याचा वध केला.


होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी अश्शूराच्या राजाने शोमरोन सर केले व इस्राएल लोकांना अश्शूर देशात नेऊन हलह व हाबोर येथे व गोजान नदीतीरी व मेद्यांच्या नगरांतून वसवले.


कालनो कर्कमीशासारखे, हमाथ अर्पादासारखे व शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?


आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”


त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.


तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.


कारण वाईट टाकावे व चांगले घ्यावे हे त्या मुलाला समजू लागण्यापूर्वी ज्या दोन राजांच्या भीतीने तू घाबरला आहेस त्यांचा देश उजाड होईल.


अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.)


कारण ह्या मुलाला आई, बाबा, म्हणता येण्यापूर्वीच अश्शूरच्या राजापुढे दिमिष्काचे धन व शोमरोनाची लूट म्हणून घेऊन जातील.”


तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ह्याचे नाव इज्रेल ठेव; कारण थोडा काळ लोटल्यावर मी इज्रेल येथील रक्तपाताचा सूड येहूच्या राजघराण्यावर उगवीन व इस्राएल घराण्याच्या राज्याचा अंत करीन.


ह्यानंतर ती पुन्हा गर्भवती होऊन तिला कन्या झाली. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, “हिचे नाव लो-रुहामा (दया न पावलेली) ठेव; कारण इस्राएल घराण्याला क्षमा करण्याइतकी दया मी त्यांच्यावर पुन्हा करणार नाही.


तुझ्या लोकांमध्ये कलह माजेल; युद्धसमयी शल्मनाने बेथ-आर्बेलास उद्ध्वस्त केले तेव्हा आईला मुलांसह आपटून मारले, तशी सर्व तटबंदीची नगरे नाश पावतील.


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


इस्राएलास गिळून टाकले आहे, राष्ट्रांमध्ये ते आता टाकाऊ भांड्यासारखे झाले आहेत.


एफ्राइमाचे वैभव पक्ष्यांप्रमाणे उडून जात आहे; जन्म, गर्भारपण व गर्भसंभव ही नाहीत, असे झाले आहे.


जे शोमरोन येथील मूर्तीची शपथ घेऊन म्हणतात की, ‘हे दाना, तुझ्या देवाच्या जीविताची शपथ, बैर-शेब्याच्या यात्रेची शपथ,’ ते पडतील; पुन्हा उठायचे नाहीत.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan