Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 अरोएराची नगरे लोक सोडून गेले आहेत; ती गुरांच्या कळपांची ठिकाणे झाली आहेत. ते तेथे बसतात; त्यांना घाबरवणारा कोणी नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 अरोएराची नगरे पूर्ण सोडून जातील. ती कळपासाठी पहुडण्याची जागा होईल आणि त्यांना कोणी घाबरवणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:2
17 Iomraidhean Croise  

तू झोपी जाशील तेव्हा तुला कोणी भिवविणार नाही; बहुत लोक तुझे आर्जव करतील.


तटबंदीचे शहर उजाड आहे; ते रानासारखे सोडून दिलेले व टाकलेले वसतिस्थान झाले आहे; तेथे वासरे चरतात, बसतात व तेथल्या फांद्या खाऊन टाकतात.


येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील.


त्या दिवशी असे होईल की एकेक मनुष्य एकेक कालवड व दोन-दोन मेंढ्या पाळील;


त्या पुष्कळ दूध देतील म्हणून तो लोणी खाईल; देशात शेष राहिलेला प्रत्येक जण लोणी व मध खाईल.


अरोएराच्या रहिवासिनी, रस्त्यावर उभी राहून पाहा; पळून जाणार्‍यास व निभावलेलीस विचार की, ‘काय झाले आहे?’


ह्या लोकांची प्रेते आकाशातल्या पाखरांना व पृथ्वीवरील पशूंना खाद्य होतील, त्यांना कोणी हाकून लावणार नाही.


मी राब्बा नगरास उंटाचा तबेला करीन, अम्मोन वंशजांचा मेंढ्याबकर्‍या बसायचा वाडा करीन; तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


ते देशात निर्भय वसतील व कोणी त्यांना धाक घालणार नाही; मग ते लज्जित होतील; माझ्याबरोबर केलेल्या विश्वासघाताचा त्यांना पस्तावा वाटेल.


ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.


समुद्रतीरींच्या प्रदेशाची कुरणे बनतील व त्यांत मेंढपाळांच्या गुहा व मेंढवाडे होतील.


गादाच्या वंशजांनी दीबोन, अटारोथ, अरोएर,


आर्णोन खोर्‍याच्या कडेला अरोएर नगर आहे तेथून व खोर्‍यात जे नगर आहे तेथून गिलादापर्यंत आम्हांला दुर्गम असे एकही नगर राहिले नाही; आपला देव परमेश्वर ह्याने ती सर्व आपल्या स्वाधीन करून दिली;


त्या वेळी आम्ही देश काबीज केला तो येणेप्रमाणे : आर्णोन खोर्‍याच्या कडेला असलेल्या अरोएर नगरापासून गिलादाच्या डोंगराळ प्रदेशाचा अर्धा भाग व त्यातील नगरे हा प्रदेश मी रऊबेनी व गादी ह्यांना दिला आहे;


त्यांचा मुलुख म्हणजे आर्णोन खोर्‍याच्या सीमेवरील अरोएर व खोर्‍यामधले नगर येथपासून मेदबापर्यंतचे पठार,


त्यांचा मुलुख म्हणजे याजेर, गिलादातली सर्व नगरे आणि राब्बाच्या पूर्वेकडील अरोएरापर्यंतचा अम्मोन्यांचा अर्धा प्रदेश.


Lean sinn:

Sanasan


Sanasan