Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करणारा पुष्कळ लोकांचा समुदाय आणि महापुराच्या जलांच्या गोंगाटासारखी गोंगाट करणारी राष्ट्रांची गर्दी यांना हायहाय!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पुष्कळ राष्ट्रे जी संतापतात त्यांना धिक्कार असो— ते उफाळणाऱ्या समुद्राप्रमाणे रागावतात! गर्जना करणाऱ्या लोकांचा धिक्कार असो— पाण्याच्या प्रचंड लोंढ्याप्रमाणे ते गर्जना करतात!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:12
21 Iomraidhean Croise  

मृत्यूच्या बंधनांनी मला वेष्टिले, नाशाच्या पुरांनी मला घाबरे केले.


परमेश्वराचा ध्वनी जलांमधून चढत आहे; प्रतापशाली देव गर्जना करीत आहे; परमेश्वर जलाशयांवर आहे.


कारण पाहा, तुझे शत्रू दंगल करीत आहेत; तुझ्या द्वेष्ट्यांनी डोके वर काढले आहे.


ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.


न्याय ही दोरी व नीतिमत्ता हा ओळंबा असे मी करीन; लबाडीचा आश्रय गारांनी वाहून जाईल, व दडण्याची जागा जलाचे ओघ बुडवून टाकतील.”


तुझ्यावर चालवण्यासाठी घडलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही; तुझ्यावर आरोप ठेवणार्‍या सर्व जिव्हांना तू दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकांचे हेच वतन आहे, हीच माझ्याकडून मिळालेली त्यांची नीतिमत्ता आहे, असे परमेश्वर म्हणतो.”


अहो राष्ट्रांनो, दंगल करा, पण तुमचा चुराडा होईल; पृथ्वीवरील दूरच्या देशांनो, कान देऊन ऐका; तुम्ही आपली कंबर बांधा, पण तुमचा चुराडा होईल.


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”


तेव्हा पाहा, इस्राएलाच्या देवाचे वैभव पूर्वेकडून प्रकट झाले; त्याचा शब्द महापुराच्या ध्वनीसारखा होता; व त्याच्या वैभवाने पृथ्वी प्रकाशित झाली.


दानिएलाने म्हटले, “मी रात्री दृष्टान्तात पाहिले तर चार्‍ही दिशांचे वारे महासागरावर सुटले;


आता पुष्कळ राष्ट्रे तुझ्याविरुद्ध जमा झाली आहेत, ती म्हणतात, ती भ्रष्ट होवो, आमचे डोळे सीयोनेला पाहून निवोत.”


कोश पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, “हे परमेश्वरा, ऊठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण होवो आणि तुझे द्वेष्टे तुझ्यापुढून पळून जावोत.”


तेव्हा सूर्य, चंद्र व तारे ह्यांत चिन्हे घडून येतील, आणि पृथ्वीवर ‘समुद्र व लाटा ह्यांच्या गर्जनेने राष्ट्रे’ घाबरी होऊन पेचात पडतील;


नंतर सात वाट्या घेतलेल्या सात देवदूतांपैकी एक जण येऊन माझ्याबरोबर बोलू लागला; तो म्हणाला, “इकडे ये, म्हणजे ‘अनेक जलप्रवाहांवर’ बसलेल्या मोठ्या कलावंतिणीचा2 झालेला न्यायनिवाडा तुला दाखवतो;


आणखी तो मला म्हणाला, “जेथे कलावंतीण बसली आहे, तेथे ‘जे जलप्रवाह’ तू पाहिलेस, ते लोक, जनसमूह, राष्ट्रे व निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan