Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 17:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ती तू लावलीस त्या दिवशी त्यांना तू कुंपण घातलेस व लावलेले बी दुसर्‍या दिवशी सकाळी फुलावे असे केलेस; पण त्याचा हंगाम दुःखाच्या व दुःसह क्लेशाच्या दिवशी केराचा ढीग होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 त्या दिवशी तू लाविले आणि कुंपण घातले व मशागत केली. लवकरच तुझे बीज वाढले, परंतु त्याचा हंगाम दुःखाच्या व भारी शोकाच्या दिवशी अयशस्वी होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 ज्या दिवशी तुम्ही त्यांना लावता, तुम्ही त्यांना वाढविता, आणि सकाळी तुम्ही त्यांची पेरणी करता, तेव्हा तुम्ही त्यांना अंकुर फुटू देता, तरीसुद्धा रोग आणि असाध्य वेदना होणाऱ्या दिवसामध्ये त्यांचे काहीच उत्पादन होणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 17:11
18 Iomraidhean Croise  

माझ्या पाहण्यात तर असे आहे की, जे अधर्माची नांगरणी करतात व दुःखाची पेरणी करतात, ते तशीच कापणी करतात.


सकाळी ते तरारून वाढते; संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.


कापणी करणारा उभ्या पिकाची कवळी धरून आपल्या हाताने कणसे कापतो तसे होईल; रेफाईम खोर्‍यात कोणी कणसे टिपतो तसे होईल.


संदेष्टे खोटे संदेश देतात, त्यांच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात व माझ्या लोकांनाही असेच आवडते; पण अखेरीस तुम्ही काय करणार?


कारण ते वार्‍याची पेरणी करून वावटळीची कापणी करतात; त्याला ताट नाही, अंकुराला कणीस येत नाही; आलेच तर ते परके खाऊन टाकतील.


एफ्राइमावर तडाका बसला आहे; त्याचे मूळ सुकून गेले आहे; त्यांना फळ येणार नाही; त्यांना संतती झालीच तर त्यांच्या गर्भाशयाचे ते प्रिय फळ मी मारून टाकीन.


ढेकळांखाली धान्यास बुरा चढला आहे, पेवे रिकामी पडली आहेत; कोठारे पडून गेली आहेत; कारण पिके बुडाली आहेत.


तुमची मेहनत व्यर्थ जाईल, कारण तुमची भूमी उपज द्यायची नाही व देशातील झाडे फळे देणार नाहीत.


की, आपल्या हटवादीपणाने पश्‍चात्तापहीन अंतःकरणाने देवाचा क्रोध व यथोचित न्याय ह्यांच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी स्वतःकरता क्रोध साठवून ठेवतोस?


तू द्राक्षमळे लावून त्यांची मशागत करशील, पण तुला द्राक्षारस प्यायला मिळणार नाही आणि द्राक्षे खुडायलाही मिळणार नाहीत; कारण कीड ती खाऊन टाकील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan