Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 माझ्या घालवून दिलेल्यांना तुझ्याजवळ राहू दे; मवाबाला लुटारूंपासून आसरा हो; कारण पिळून काढणारा नष्ट झाला आहे; नासधूस बंद झाली आहे; पायमल्ली करणारे देशातून नाहीतसे झाले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मवाबामधील निर्वासितास, तुझ्यात राहू दे; तू त्यांना नाश करणाऱ्यापासून लपण्याचे ठिकाण हो. कारण जुलूम करणारा थांबेल आणि नासधूस बंद होईल. ज्यांनी तुडवले ते देशातून नाहीसे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 पलायन केलेल्या मोआबी लोकांना तुमच्याबरोबर राहू द्या; संहारकापासून त्यांचा आश्रय व्हा.” जुलूम करणाऱ्याचा शेवट होईल, आणि नाश थांबेल; आक्रमण करणारे नाहीसे होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 16:4
22 Iomraidhean Croise  

त्या दिवशी असे होईल की बाबेलच्या राजासंबंधाने हे कवन तू म्हणशील : “पिडणारा कसा नाहीसा झाला! पिळून काढणारी नगरी कशी नष्ट झाली आहे!


निम्रीमाचे पाणी आटले आहे, गवत वाळून गेले आहे; झाडपाला सुकून गेला आहे; हिरवळ नाहीशी झाली आहे.


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


तुझा छळ करणार्‍यांना स्वतःचेच मांस खायला लावीन; नव्या द्राक्षारसाने जसे लोक मस्त होतात तसे ते आपल्या रक्ताने मस्त होतील; ह्यावरून मी परमेश्वर तुझा त्राता, तुझा उद्धारकर्ता, याकोबाचा समर्थ प्रभू आहे हे सर्व मानवजातीला समजेल.”


आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा परमेश्वर तुझा कर्ता, ह्याला तू का विसरलीस? जुलूम करणारा तुझा नाश करण्यास पाहत आहे म्हणून त्याच्या क्रोधास सारा दिवस एकसारखी का भितेस? जुलम्याचा क्रोध उरला आहे कोठे?


नीतिमत्तेने तू खंबीर होशील, जाचापासून दूर राहशील, कारण तुला भीतीच उरणार नाही; तू धाकापासून दूर राहशील, तो तुझ्याजवळ येणार नाही;


तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?


कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.


‘परमेश्वर म्हणतो, हे दावीदघराण्या, रोज सकाळी न्यायनिवाडा कर; जुलम्याच्या हातातून लुबाडलेल्यांना सोडव; नाहीतर तुझ्या कर्माच्या दुष्टतेमुळे माझा संताप अग्नीसारखा भडकेल. तो कोणाच्याने विझवणार नाही.”’


त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,


दीबोननिवासी कन्ये, आपल्या वैभवापासून खाली उतर, रुक्ष भूमीवर बस; कारण मवाबाचा विध्वंस करणारा तुझ्यावर चाल करून आला आहे, त्याने तुझ्या दुर्गाचा विध्वंस केला आहे.


प्रत्येक नगरावर लुटारू येईल; कोणतेही नगर निभावणार नाही; खोरे नाश पावेल; पठार उद्ध्वस्त होईल असे परमेश्वर बोलला आहे.


त्यांच्या पळून जाणार्‍यांना मारून टाकण्यासाठी चव्हाठ्यावर उभा राहू नकोस, संकटाच्या दिवशी त्यांच्या निभावलेल्यांना धरून देऊ नकोस.


वाटेतला चिखल तुडवत युद्धाला निघालेल्या योद्ध्याप्रमाणे ते होतील; ते युद्ध करतील, कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर आहे; घोडेस्वार फजीत होतील.


कोणी येऊजाऊ नये म्हणून मी सैन्य रोखण्यासाठी माझ्या मंदिराभोवती तळ देईन; जुलूम करणारा पुन्हा त्यांच्यावर चाल करून जाणार नाही; कारण आता मी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे.


तुम्ही दुष्टांना तुडवाल; कारण मी हे करीन त्या दिवशी ते तुमच्या पायांच्या तळव्यांखाली राखेप्रमाणे होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ते तलवारीच्या धारेने पडतील, त्यांना बंदिवान करून सर्व राष्ट्रांमध्ये नेतील, आणि परराष्ट्रीयांची सद्दी संपेल तोपर्यंत ‘परराष्ट्रीय यरुशलेमेस पायांखाली तुडवतील.’


शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्यासह असो.


तुझ्या बांधवांपैकी अथवा देशातील तुझ्या गावात राहणार्‍या उपर्‍यांपैकी एखादा मजूर दीन व कंगाल असला तर त्याच्यावर जुलूम करू नकोस,


तरी मंदिराबाहेरचे अंगण सोड, त्याचे माप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना दिले’ आहे; आणि ते बेचाळीस महिने पवित्र नगरी ‘तुडवतील.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan