Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मवाब देवदर्शन घेईल आणि उंच स्थानी रडून-रडून थकेल; तो देवघरात प्रार्थना करण्यास जाईल तरी त्याचे काही चालणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 जेव्हा मवाब स्वतः उंचस्थानावर जाताना थकेल आणि प्रार्थना करायला त्याच्या मंदिरात प्रवेश करील, तरी त्याची प्रार्थना काहीच सिद्धीस नेणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जेव्हा मोआब तिच्या उच्चस्थानी दर्शनास जाते, तेव्हा ती फक्त स्वतःला थकविते; जेव्हा ती तिच्या दैवतांची प्रार्थना करावयाला जाते, तेव्हा त्याचा काही उपयोग होत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 16:12
24 Iomraidhean Croise  

तेव्हा शलमोनाने यरुशलेमेच्या समोरील पहाडावर मवाबाचे अमंगळ दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मोलख ह्यांच्यासाठी एकेक उंच स्थान बांधले.


दुपार टळून गेल्यावर संध्याकाळच्या यज्ञसमयापर्यंत ते बडबडत राहिले पण काही वाणी झाली नाही, कोणी उत्तर दिले नाही किंवा लक्ष पुरवले नाही.


गोजान, हारान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक ह्यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय?


तेव्हा त्याने आपला ज्येष्ठ पुत्र युवराज ह्याला नेऊन तटावर त्याचा होम केला, ह्यावरून इस्राएलावर फार कोप झाला व ते त्याला सोडून स्वदेशी परत गेले.


तेव्हा ते मला हाक मारतील; पण मी उत्तर देणार नाही; ते मला आसक्तीने शोधतील, पण मी त्यांना सापडणार नाही;


बईथ व दीबोन उच्च स्थानी विलाप करण्यास चढून जात आहेत; नबो व मेदबा ह्यांवर जाऊन मवाब आक्रंदन करीत आहे; सर्वांची डोकी मुंडलेली आहेत; प्रत्येकाची दाढी काढलेली आहे.


मवाबाविषयी गतकाळी परमेश्वराने जे वचन विदित केले ते हे :


हे परमेश्वरा, संकटाच्या वेळी त्यांनी तुझ्याकडे दृष्टी फिरवली; त्यांना तुझ्याकडून शिक्षा झाली तेव्हा त्यांनी मंद स्वराने आपले हृद्‍गत तुला कळवले.


तेव्हा असे झाले की तो आपले दैवत निस्रोख ह्याच्या देवळात पूजा करीत असता त्याचे पुत्र अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याला तलवारीने वधले व ते अरारात देशात पळून गेले. मग त्याच्या जागी त्याचा पुत्र एसर-हद्दोन राजा झाला.


तू पुष्कळ मसलती करता करता थकलीस; तर तुझ्यावर काय काय येणार हे तुला दर चंद्रदर्शनाच्या वेळी कळवणारे ज्योतिषी व नक्षत्र पाहणारे पुढे येवोत; त्यांच्याने तुझा बचाव होईल तर ते करोत.


त्या मूर्ती बागेतल्या बुजगावण्यासारख्या आहेत; त्यांना बोलता येत नाही, त्या उचलून न्याव्या लागतात, कारण त्यांना चालता येत नाही; त्यांना भिऊ नका; कारण त्यांच्याने काही वाईट करवत नाही, व त्यांना काही बरे करण्याचे सामर्थ्य नाही.”


आपल्या भरवशाचा विषय जे बेथेल त्याच्यासंबंधाने इस्राएल फजीत झाला तसा मवाब कमोशासंबंधाने फजीत होईल.


परमेश्वर म्हणतो, तसेच मवाबातून उच्च स्थानी अर्पण वाहणारा, व आपल्या दैवतांना धूप दाखवणारा, नाहीसा होईल असे मी करीन.


हे मवाबा, तू हायहाय करणार! कमोशाचे लोक नष्ट झाले आहेत! कारण तुझे पुत्र बंदिवान करून नेले आहेत, तुझ्या कन्या बंदिवान करून नेल्या आहेत.


तुझी कर्मे व तुझे निधी ह्यांच्यावर तुझी भिस्त होती म्हणून तू हस्तगत होशील; कमोश आपले याजक व सरदार ह्यांच्यासह बंदिवान होऊन जाईल.


कारण हेशबोनातून अग्नी निघाला आहे. सीहोनाच्या नगरातून ज्वाला निघाली आहे; तिने मवाबाचे आर, आणि आर्णोनेच्या गढ्यांचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.


मग बलाम बालाकाबरोबर गेला व ते किर्याथ-हसोथ येथे आले.


सकाळी बालाक बलामाला बामोथ-बआलाच्या उंच स्थानी घेऊन गेला व तेथून त्याने इस्राएल लोकांचा जवळचा पसारा पाहिला.


तो त्याला पिसगाच्या माथ्यावरील सोफिमाच्या माळावर घेऊन गेला; तेथे त्याने सात वेद्या बांधल्या व प्रत्येक वेदीवर एकेक गोर्‍हा व एकेक मेंढा अर्पण केला.


तेव्हा बालाकाने बलामास रानाच्या कडेला असलेल्या पौर डोंगराच्या माथ्यावर नेले.


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan