Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 15:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 दीमोनाचे जलप्रवाह रक्ताने भरले आहेत; आणि दीमोनावर मी आणखी अरिष्ट आणणार; मवाबाच्या वाचलेल्या लोकांवर व देशातील अवशिष्ट लोकांवर एक सिंह आणणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 दिमोनाचे पाणी रक्ताने भरलेले आहे, परंतु मी दिमोनवर आणखी विपत्ती आणेन— मोआबच्या पलायन केलेल्या लोकांवर आणि देशातील अवशिष्ट लोकांवर मी सिंह पाठवेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 15:9
11 Iomraidhean Croise  

ते तेथे वस्ती करून राहू लागले तेव्हा ते आरंभी परमेश्वराचे भय बाळगत नसत म्हणून परमेश्वराने त्यांच्यामध्ये सिंह पाठवले; त्यांनी त्यांच्यातल्या कित्येकांना मारून टाकले.


कारण मवाबाच्या प्रदेशात चोहोकडे आरडाओरड झाली आहे; त्यांचे आक्रंदन एग्लाइमापर्यंत, त्यांचा आक्रोश बैर-एलीमापर्यंत ऐकू जात आहे.


“परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्यावर चार गोष्टी आणीन : ठार करण्यास तलवार, फाडून टाकण्यास कुत्रे, खाऊन नाश करण्यास आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवरील श्वापदे.


“इस्राएल भटकलेले मेंढरू आहे; सिंहांनी त्याला बुजवले आहे; त्याला प्रथम खाणारा अश्शूराचा राजा; शेवटी त्याची हाडे मोडणारा बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर.


इतके केल्यावरही तुम्ही माझे ऐकले नाही तर तुमच्या पापांबद्दल मी तुम्हांला सातपट शिक्षा करीन,


तर मीही तुमच्या अगदी विरुद्ध जाईन आणि मीच तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


तर मी संतापून तुमच्याविरुद्ध चालेन आणि तुमच्या पापांबद्दल तुम्हांला सातपट शिक्षा करीन.


एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तर त्याला अस्वल गाठते, तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो तर त्याला सर्प दंश करतो, तसा हा प्रकार आहे.


आम्ही त्यांना बाण मारले आहेत; दीबोनापर्यंत हेशबोनाचा नाश झाला आहे, आणि नोफापर्यंत सर्व देश आम्ही उजाड केल्यावर मेदबापर्यंत आग पसरली आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan