Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 राष्ट्राच्या जासुदांना काय उत्तर द्यावे? “परमेश्वराने सीयोन स्थापली आहे; त्याच्या लोकांपैकी दीनदुर्बळ तिच्यात आश्रय करून आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 तर त्या राष्ट्राच्या दूताला कोण एक उत्तर देईल? परमेश्वराने सीयोन स्थापले आहे आणि त्याच्या लोकांतले पीडीत त्यामध्ये आश्रय घेतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आता राष्ट्रांच्या राजदूतांना काय उत्तर देण्यात यावे? “याहवेहने सीयोन स्थापिले आहे, आणि त्यांच्या पीडितांना तिच्यात आश्रय मिळेल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:32
30 Iomraidhean Croise  

दाविदाने हददेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता म्हणून तोई राजाने दावीद राजाचे क्षेमकुशल विचारायला व त्याचे अभिनंदन करायला आपला पुत्र योराम ह्याला त्याच्याकडे पाठवले; कारण हददेजर व तोई ह्यांच्या लढाया होत असत. योरामाने आपल्याबरोबर चांदीची, सोन्याची व पितळेची पात्रे आणली;


कारण परमेश्वराने सीयोन पुन्हा बांधली आहे, तो आपल्या गौरवाने प्रकट झाला आहे;


तुझ्या सेवकांचे वंशज कायम टिकून राहतील, त्यांची संतती तुझ्यासमोर स्थायिक होईल.


कारण पाहा, राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले.


परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.


सीयोनेविषयी म्हणतील की, हा आणि तो तिच्यातच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.


परमेश्वराचे नाम बळकट दुर्ग आहे, त्यात नीतिमान धावत जाऊन निर्भय राहतो.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


अगे सीयोननिवासिनी, जयघोष कर, गजर कर; इस्राएलाचा पवित्र प्रभू तुझ्या ठायी थोर आहे.”


कारण निर्दय लोकांचा झपाटा भिंतीवर आदळणार्‍या वादळाप्रमाणे आहे; पण तू दुर्बलास दुर्ग, लाचारास विपत्काली आश्रय, वादळात निवारा, उन्हात सावली, असा झालास.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, सीयोनेत पायाचा दगड बसवणारा मी आहे; मी पारखलेला दगड आहे; ती पायाला योग्य अशी मजबूत व मोलवान कोनशिला आहे; ‘विश्वास ठेवणार्‍याची त्रेधा उडणार नाही.’


नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल; लोकांतील दीन जन इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील.


कारण यरुशलेमेतून अवशेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील; सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल.


मग कूशाचा राजा तिर्‍हाका आपणांशी लढायला निघाला आहे असे कोणी बोलताना त्याने ऐकले. हे ऐकून त्याने हिज्कीयाला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की,


त्या वेळी बलदानाचा पुत्र मरोदख बलदान,1 जो बाबेलचा राजा, त्याने हिज्कीयाला पत्रे व नजराणा ही पाठवली; कारण तो आजारी पडल्यानंतर बरा झाला असे त्याने ऐकले होते.


आणि दिवसा ऊन लागू नये, सावली व्हावी; आणि वादळ व पाऊस ह्यांपासून रक्षण होण्यासाठी निवारा व आश्रय असावा म्हणून मंडप घालण्यात येईल.


मी कोरेशाविषयी म्हणतो, ‘तो माझा मेंढपाळ आहे, तो माझे सर्व मनोरथ सिद्धीस नेईल.’ तो यरुशलेमेविषयी म्हणेल, ‘ती बांधण्यात येईल, मंदिराचा पाया घालण्यात येईल.”’


अगे पिडलेले, वादळांनी त्रस्त झालेले, सांत्वन न पावलेले, मी तुझे पाषाण सुरम्य प्रकारे बसवीन आणि नीलमण्यांनी तुझा पाया घालीन.


तू धावा करशील तेव्हा तुझ्या मूर्तींच्या समुदायाने तुला सोडवावे; त्या सगळ्यांना तर वारा उडवून नेईल, एक फुंकर त्यांना घेऊन जाईल; पण जो माझा आश्रय करील तो पृथ्वीचे वतन पावेल आणि माझ्या पवित्र पर्वताचा ताबा घेईल.


ह्या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र अठरा हजार हात असावे; ह्या नगराचे नाव येथून पुढे याव्हे-शाम्मा (तेथे परमेश्वर आहे) असे पडेल.”


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


त्या दिवशी ती मोडली; तेव्हा ज्यांनी माझे ऐकले होते असे त्या कळपांत असलेले अतिशय दुबळे समजले की, हे परमेश्वराचे वचन आहे.


मी वधासाठी नेमलेल्या मेंढरांना चारले, मेंढरांतल्या अतिशय दुबळ्यांना चारले. मी दोन काठ्या घेतल्या. एकीचे नाव रमणीयता व दुसरीचे नाव बंधन असे ठेवले. आणि मी त्या कळपांना चारले.


आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही.


कारण पाये असलेल्या व देवाने योजलेल्या व बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता.


पण तुम्ही सीयोन पर्वत, जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत,


माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; लोकदृष्टीने जे दरिद्री आहेत त्यांना विश्वासासंबंधाने धनवान होण्यास आणि जे राज्य देवाने आपल्यावर प्रीती करणार्‍यांना देऊ केले त्याचे वारस होण्यास त्याने निवडले आहे की नाही?


Lean sinn:

Sanasan


Sanasan