Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 गरिबांतले गरीब पोटभर खातील; गरजवंत सुखाने झोप घेतील; तुझे मूळ मी क्षुधेने मारीन व तुझा अवशेष वधतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 गरीबाचे प्रथम जन्मलेले खातील, आणि गरजवंत सुरक्षितेत पडून राहतील. मी तुझे मूळ उपासमारीने मारीन तो तुझे उरलेले सर्व मारून टाकील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 गरिबांतील गरिबांना कुरण सापडेल, आणि गरजवंत सुरक्षितेत झोप घेतील. पण तुझे मूळ दुष्काळाने नष्ट होईल; ते तुझ्या अवशिष्टांचा तलवारीने नाश करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:30
21 Iomraidhean Croise  

ते त्याच्या शरीराचे अवयव तोडून खाईल; मृत्यूचा ज्येष्ठ पुत्र त्याचे अवयव ग्रासील.


तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील, आणि पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील; तो आपल्या मुखरूप वेत्राने पृथ्वीला ताडन करील, आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार थकरील.


नम्र जनांचा परमेश्वराच्या ठायीचा आनंद वृद्धी पावेल; लोकांतील दीन जन इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या ठायी उल्लास पावतील.


परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील : “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही;


आता तुला हे चिन्ह देतो : यंदा तुम्ही आपोआप उगवलेले खाल, पुढल्या वर्षी त्याला खोडवा फुटेल तो खाल; तिसर्‍या वर्षी तुम्ही पेरा, कापा, द्राक्षांचे मळे लावा व त्यांचे फळ खा.


येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील.


तुझ्यावर ह्या दोन गोष्टी गुदरल्या : उजाडी व नाश, दुष्काळ व तलवार; तुझे समाधान कोण करील? मी तुझे सांत्वन कसे करू?


ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;


ते उजवीकडे लचके तोडतात तरी भुकेले राहतात; ते डावीकडे खातात तरी त्यांची तृप्ती होत नाही; प्रत्येक जण आपल्याच बाहूचे मांस खातो,


मी तुझ्यामध्ये नम्र व गरीब लोक राहू देईन, ते परमेश्वराच्या नामावर श्रद्धा ठेवतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan