Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 सेनाधीश परमेश्वराने संकल्प केला आहे तो कोणाच्याने रद्द करवेल! त्याचा हात उगारलेला आहे तर तो कोणाच्याने मागे आणवेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 कारण सेनाधीश परमेश्वराने हा संकल्प केला आहे; तो कोण थांबवू शकेल? त्याचा हात उगारलेला आहे, आणि तो कोणाच्याने मागे वळवू शकेल?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 सर्वसमर्थ याहवेहचा हा संकल्प आहे, तो कोण निष्फळ करू शकतो? त्यांचा हात उठला आहे, त्याला कोण आवर घालू शकतो?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:27
22 Iomraidhean Croise  

तो म्हणाला, “हे आमच्या पूर्वजांच्या देवा, परमेश्वरा, तू स्वर्गीचा देव आहेस ना? राष्ट्रांच्या सर्व राज्यांवर तूच शास्ता आहेस ना? तुझ्या हाती एवढे सामर्थ्य व पराक्रम आहे की कोणाच्याने तुझ्यासमोर टिकाव धरवत नाही.


भ्रमण करीत असता त्याने एखाद्याला पकडून अटकेत टाकले, आणि न्यायसभा भरवली, तर त्याचा हात कोण धरील?


तो न बदलणारा आहे, त्याला त्यापासून कोण फिरवणार? आपल्या मनास येते ते तो करतो;


तू माझे न्याय्यत्व खोटे पाडू पाहतोस काय? आपण निर्दोषी ठरावे म्हणून तू मला दोषी ठरवतोस काय?


“तुला सर्वकाही करता येते; तुझ्या कोणत्याही योजनेला प्रतिबंध होणे नाही, असे मला कळून आले आहे.


तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? ‘तू हे काय करतोस,’ असे त्याला कोण म्हणणार?


परमेश्वराची योजना सर्वकाळ टिकते; त्याच्या मनातील संकल्प पिढ्यानपिढ्या कायम राहतात.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


सर्व डामडौलास बट्टा लागावा व जगातील सर्व महाजनांची अप्रतिष्ठा व्हावी, म्हणून हे सेनाधीश परमेश्वराने योजले आहे.


“येथून पुढेही मीच तो आहे; माझ्या हातातून कोणाला सोडवून घेता येणार नाही; मी करतो ते कोणाच्याने पालटवणार?”


उगवतीकडून मी हिंस्र पक्षी बोलावतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलावतो, मी बोललो तसे घडवूनही आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो.


मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1


पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ह्यामुळे पृथ्वी शोक करील, वर आकाश काळे होईल; कारण मी असे बोललो आहे, मी हे योजले आहे; मी अनुताप पावणार नाही; मी माघार घेणार नाही.”


तलवारीपासून निभावलेले असे अगदी थोडे लोक मिसर देशातून यहूदा देशात परत जातील; आणि जे यहूदाचे सर्व अवशिष्ट लोक मिसर देशात काही दिवस राहण्यास गेले आहेत त्यांना, माझा शब्द खरा ठरतो की त्यांचा खरा ठरतो, हे कळून येईल.


ह्यास्तव परमेश्वराने अदोमाविरुद्ध केलेला संकल्प व तेमानाच्या रहिवाशांविषयी केलेल्या योजना ऐका : ते त्यांना, कळपांतील लहानसहानांना नेतील; त्यांची वस्ती त्यांच्यामुळे खातरीने विस्मय पावेल.


यहूदाचा राजा सिद्कीया आपल्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलास गेला, त्याच्याबरोबर सराया बिन नेरीया बिन मासेया गेला होता. त्याला यिर्मया संदेष्ट्याने जे आज्ञावचन सांगितले ते हे. सराया बिनीवाला सरदार होता.


मी तुझा उघडा खडक करून तुला जाळे पसरण्याचे ठिकाण करीन; तुला पुन्हा बांधणार नाहीत; मी परमेश्वराने हे म्हटले आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास आपल्याला प्रतिकूल कोण?


Lean sinn:

Sanasan


Sanasan