Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 मी तिला घुबडाची मालमत्ता व पाण्याचे तळे असेही करीन, आणि मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर जाहीर करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 “मी तिला घुबडांचे निवासस्थान आणि दलदलीचा प्रदेश करेन; मी तिला नाशाच्या झाडूने झाडून टाकेन,” असे सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:23
17 Iomraidhean Croise  

ह्यास्तव, पाहा, मी यराबामाच्या घराण्यावर अरिष्ट आणीन, यराबामाच्या घराण्यातल्या प्रत्येक पुरुषाचा मी उच्छेद करीन, मग तो इस्राएलाच्या बंदीत असो की मोकळा असो; ज्याप्रमाणे शेण अगदी साफ निघून जाईपर्यंत काढून टाकतात त्याप्रमाणे मी यराबामाचे घराणे काढून टाकीन.


मी शोमरोनावर लावलेले मापनसूत्र व अहाबाच्या घराण्याला लावलेला ओळंबा यरुशलेमेला लावीन; थाळी जशी घासूनपुसून व उलथीपालथी करून ठेवतात तसेच मी यरुशलेमेचे करीन.


त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


तुम्ही सर्व चोहोकडून त्याच्यावर चढाई करा; त्याची भांडारे उघडा; त्याचे ढीग करा; त्याचा विध्वंस करा; त्याचे काही शिल्लक राहू देऊ नका.


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


आणि म्हण, ‘हे परमेश्वरा, तू ह्या स्थानाविषयी म्हणाला आहेस की ते नष्ट होईल, त्यात कोणी मनुष्य अथवा पशू राहणार नाही, ते कायमचे ओसाड होईल.’


गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,


त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’


तो जोरदार वाणीने म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली;’ ती ‘भुतांची वस्ती’ व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan