Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्यांच्याबरोबर तुला मूठमाती मिळणार नाही, कारण तू आपल्या देशाची नासधूस केली व आपल्या प्रजेचा वध केला; कुकर्म्यांच्या वंशाचे नाव कधी मागे उरणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 जसे पाया खाली तुडवलेले मृत शरीर, तुला कधीच त्यांच्याबरोबर पुरण्यात येणार नाही, कारण तू आपल्या देशाचा नाश केला आहे. तू आपले लोक वधले आहेत, जे वाईट करणाऱ्यांची मुले आहेत आणि त्यांचा कधी पुन्हा उल्लेख होणार नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तुम्ही त्यांच्या दफनविधीमध्ये सामील होणार नाही, कारण तुम्ही तुमच्या देशाचा नाश केला आहे आणि तुमच्या लोकांना ठार मारले आहे. दुष्ट लोकांच्या संततीचा पुन्हा कधीही उल्लेख केला जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:20
13 Iomraidhean Croise  

तिला मूठमाती देण्यासाठी ते गेले तेव्हा तिची कवटी, पाय व हाताचे तळवे ह्यांखेरीज तिचे त्यांना काही सापडले नाही.


खालून त्याचे मूळ सुकेल, व वरून त्याची डाहळी छाटतील.


देशातून त्याची आठवण बुजेल, व पेठेत त्याचे नाव राहणार नाही.


त्याच्या लोकांत त्याचे कोणी पुत्रपौत्र आढळणार नाहीत; त्याच्या बिर्‍हाडात कोणी उरणार नाही.


त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.


त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील,


कारण परमेश्वराला न्याय प्रिय आहे; तो आपल्या भक्तांना सोडत नाही; त्यांचे रक्षण सर्वकाळ होते; पण दुर्जनांच्या संततीचा उच्छेद होतो.


कोणा मनुष्याला शंभर मुले झाली व तो बहुत वर्षे जगला, त्याच्या आयुष्याची वर्षसंख्या मोठी असली, तरी त्याचा जीव सुखप्राप्तीने समाधान पावला नाही, त्याचे उत्तरकार्य झाले नाही, तर अशा मनुष्यापेक्षा मृतपिंड पुरवला, असे मी म्हणतो.


किती हे पापिष्ट राष्ट्र! दुष्कर्माने भारावलेले लोक, दुर्जनांची संतती! ही आचारभ्रष्ट मुले! ह्यांनी परमेश्वराला सोडले आहे, इस्राएलाच्या पवित्र प्रभूला तुच्छ मानले आहे; ती वियुक्त होऊन मागे फिरली आहेत.


तरी तोही सुज्ञ आहे, तो अरिष्ट आणील, आपली वचने मागे घेणार नाही; तर दुष्कर्म्यांच्या घराण्यावर व अधर्म करणारे ह्यांच्या कुमकेवर उठेल.


ह्यामुळे प्रभू त्यांच्या तरुणांवर प्रसन्न होत नाही; त्यांचे अनाथ व विधवा ह्यांचा त्याला कळवळा येत नाही; कारण ते सर्व अधर्मी व कुकर्मी आहेत; प्रत्येक मुख मूर्खपणाच्या गोष्टी बोलते. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan