Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 पण तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे आपल्या थडग्यापासून दूर झुगारून दिले आहे; वधलेले, तलवारीने विंधलेले, गर्तेच्या धोंड्यामध्ये पडलेले ह्यांनी तू वेष्टला आहेस. पायांखाली तुडवलेल्या मढ्यासारखा तू झाला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 पण, तुला फेकून दिलेल्या फांदीप्रमाणे तुझ्या कबरेतून काढून बाहेर फेकले आहे. जे तलवारीने भोसकलेले, खाचेतल्या दगडांमध्ये खाली उतरले जातात, तसे तू मृत्युने झाकला आहेस.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 परंतु तुला तुझ्या कबरेतून नको असलेल्या फांदीसारखे बाहेर टाकले आहे; ज्यांना तलवारीने भोसकून टाकले, जे दगडांच्या खड्ड्यात टाकण्यात येतात, ज्याप्रकारे माणसांची प्रेते पायाखाली तुडविली जातात तसे त्यांना तुमच्यावर झाकून टाकले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:19
17 Iomraidhean Croise  

तू त्याला सांग, परमेश्वर म्हणतो, तू खून करून मळ्याचा ताबा घेतला आहेस काय? तू त्याला सांग, ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथाचे रक्त चाटून खाल्ले त्याच ठिकाणी कुत्री तुझेही रक्त चाटून खातील.”


अहाबाचा जो कोणी नगरात मरेल त्याला कुत्री खातील व जो कोणी रानावनात मरेल त्याला आकाशातले पक्षी खातील.”


तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर ह्याला सांगितले, “त्याला उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे; त्याचा बाप अहाब ह्याच्यामागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव;


जो कोणी सापडेल त्याला भोसकतील; ज्या कोणाला पकडतील तो तलवारीने पडेल.


राष्ट्रांचे राजे सगळे आपापल्या घरी गौरवाने निद्रिस्त आहेत;


त्यांच्यातले वधलेले बाहेर टाकून देतील, त्यांच्या प्रेतांची दुर्गंधी सुटेल व त्यांच्या रक्ताने पर्वत विरघळतील.


ह्यासाठी परमेश्वराचा क्रोध त्याच्या लोकांवर पेटला आहे; त्याने आपला हात त्यांच्यावर उगारून त्यांना मारले आहे, आणि डोंगर थरारले; त्यांची प्रेते रस्त्यातल्या घाणीसारखी आहेत. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


ह्या देशातील लहानथोर मरतील; कोणी त्यांना पुरणार नाहीत, कोणी त्यांच्याकरता शोक करणार नाहीत, कोणी त्यांच्यामुळे आपल्या शरीरांना घाय करणार नाहीत, त्यांच्यामुळे आपली डोकी भादरणार नाहीत.


गाढवाच्या मूठमातीसारखी त्याची मूठमाती होईल; त्याचे शव यरुशलेमेच्या वेशींबाहेर ओढत नेऊन फेकून देतील.”


ते शहराच्या मध्यभागी आल्यावर असे झाले की इश्माएल बिन नथन्या ह्याने व त्याच्या साथीदारांनी त्यांना जिवे मारून विहिरीत फेकून दिले.


इश्माएलाने पूर्वी ज्यांना मारले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकली होती; ही विहीर आसा राजाने इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या ह्याने प्रेतांनी भरून काढली.


म्हणजे खास्द्यांच्या देशात लोक वध पावून पडतील, त्याच्या आळ्यांतून विंधलेले पडतील.


त्यांच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत; तिच्यासभोवती त्यांचा समुदाय आहे; जिवंतांच्या भूमीस ज्यांनी दहशत घातली ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत.


बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते वीरांना दहशत घालत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan