Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 जे तुला पाहतील ते तुला निरखून मनात म्हणतील की, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापवली व राज्ये डळमळवली तो हाच का पुरुष?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जे तुझ्याकडे निरखून पाहतील; तुझ्याबद्दल विचार करतील. ते म्हणतील, ‘ज्याने पृथ्वी थरथर कापविली व राज्ये डळमळविली तो हाच का पुरुष?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 जे तुझ्याकडे पाहतात ते टक लावून बघत आहेत, ते तुझ्या नशिबाविषयी विचार करतात: “हा तोच मनुष्य आहे काय, ज्याने पृथ्वीला हादरविले होते आणि राज्यांना कंप सुटेल असे केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:16
13 Iomraidhean Croise  

“पाहा, हाच तो पुरुष, ह्याने देवाला आपले आश्रयस्थान केले नाही, तर ह्याने आपल्या विपुल धनावर भरवसा ठेवला आणि हा दुष्कर्माने माजला.”


तेव्हा मानवजातीस धाक बसेल; ते देवाची कृती वाखाणतील व त्याच्या कृतीचा नीट विचार करतील.


त्या तुला अधोलोकात, गर्तेच्या अधोभागात टाकले आहे.


ज्याने जगाचे रान केले, त्यातील नगरांचा विध्वंस केला, व आपल्या बंदिवानांना मुक्त करून घरी जाऊ दिले नाही तो हाच का पुरुष?’


हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे!


त्यांच्या कबरा गर्तेच्या अगदी तळाशी आहेत; तिच्यासभोवती त्यांचा समुदाय आहे; जिवंतांच्या भूमीस ज्यांनी दहशत घातली ते सर्व वध पावले आहेत, तलवारीने पडले आहेत.


बेसुंती लोकांपैकी जे वीर समरांगणात पडून शस्त्रास्त्रांसह अधोलोकी गेले व ज्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली ठेवण्यात आल्या अशांबरोबर हे पडून राहिले नाहीत काय? कारण जिवंताच्या भूमीत ते वीरांना दहशत घालत, म्हणून त्यांची पातके त्यांच्या हाडांच्या ठायी आहेत.


तुझ्यावर हेंदर फेकून तुला तुच्छ करीन, तुला उपहासविषय करीन.


ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात.


तर मग तो आपले भरलेले जाळे रिकामे करून राष्ट्रांची काहीएक गय न करता त्यांचा सतत घात करत राहील काय?


Lean sinn:

Sanasan


Sanasan