Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 14:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 हे देदिप्यमान तार्‍या,1 प्रभातपुत्रा, तू आकाशातून कसा पडलास! राष्ट्रांना लोळवणार्‍या तुला धुळीत कसे टाकले!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 हे र्देदीप्यमान ताऱ्या, प्रभातपुत्रा, तू आकाशातून खाली कसा पडला आहेस! ज्या तू राष्ट्रांस जिंकले, तुला तोडून कसा जमिनीवर टाकला आहे!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 पहाटेच्या ताऱ्या, सूर्योदयाच्या पुत्रा! तू स्वर्गातून कसा पडला आहेस, तू, ज्याने एकेकाळी राष्ट्रांना खाली पाडले, तू पृथ्वीवर फेकला गेला आहेस!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 14:12
18 Iomraidhean Croise  

आकाशातील तारे व नक्षत्रे आपला प्रकाश देणार नाहीत; सूर्य उदय पावताच काळाठिक्कर पडेल, चंद्र आपला प्रकाश देणार नाही.


आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


हा सर्व जगाचा हातोडा कसा मोडूनतोडून टाकला आहे! बाबेल सर्व राष्ट्रांमध्ये कसा ओसाड झाला आहे!


बाबेल गगनापर्यंत उन्नत झाला असला, त्याने आपल्या उंच गढ्या अजिंक्य केल्या असल्या तरी माझ्याकडून त्याचा नाश करणारे येतील, असे परमेश्वर म्हणतो.


हायहाय! प्रभू सीयोनकन्येस क्रोधरूप अभ्राने कसा वेष्टत आहे! त्याने इस्राएलाचे वैभव आकाशातून पृथ्वीवर झुगारून दिले आहे; त्याने आपल्या संतापाच्या दिवशी आपल्या पादासनाचे स्मरण केले नाही.


ते तुझ्याविषयी शोक करून म्हणतील, ‘अगे कीर्तिमान नगरी, तू जशी काय समुद्रातून उद्भवून बसली होतीस, तू समुद्रावर पराक्रमी होतीस, तू व तुझे रहिवासी ह्यांचा तेथील सर्व लोकांना वचक असे, ती तू कशी नष्ट झालीस!


तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्‍यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा त्याने त्यांना म्हटले, “सैतान आकाशातून विजेसारखा पडला हे मी पाहिले.


शिवाय अधिक निश्‍चित असे संदेष्ट्याचे1 वचन आमच्याजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे; तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व पहाटचा तारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर बरे होईल.


कारण ज्या देवदूतांनी पाप केले त्यांची देवाने गय केली नाही; तर त्यांना नरकात2 टाकले आणि न्यायनिवाड्याकरता अंधकारमय खाड्यात3 राखून ठेवले;


आणि मी त्याला प्रभाततारा देईन.


ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.”


तिसर्‍या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झर्‍यांच्या एक तृतीयांश पाण्यावर पडला;


पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्याच्याजवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan