यशायाह 14:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 कारण याकोबावर परमेश्वर दया करील; तो पुन्हा इस्राएलास निवडून घेईल, त्यांना त्यांच्या स्वदेशात वसवील; त्यांना परके येऊन मिळतील; ते याकोबाच्या घराण्याशी लगटून राहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वर याकोबावर दया करील; तो इस्राएलाची पुन्हा निवड करील आणि त्यांना त्यांच्या स्वतःच्या देशात स्थापील. परके त्यांच्यात सहभागी होतील आणि ते स्वतः याकोबाच्या घराण्याला जडून राहतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 याहवेह याकोबवर दया करतील; पुन्हा एकदा ते इस्राएलची निवड करतील आणि त्यांना त्यांच्या मातृभूमीत स्थायी करतील. परदेशी लोक त्यांच्यात सामील होतील आणि याकोबाच्या वंशजांसोबत एकत्र येतील. Faic an caibideil |
ज्याला माणसे तुच्छ लेखतात, ज्याला लोक अमंगल मानतात, जो अधिपतींचा दास आहे, त्याला इस्राएलाचा उद्धारकर्ता, इस्राएलाचा पवित्र प्रभू जो परमेश्वर, तो म्हणतो, “राजे तुला पाहून उठून उभे राहतील, अधिपती तुला नमन करतील. परमेश्वर जो सत्यवचनी आहे, इस्राएलाचा पवित्र प्रभू आहे, त्याने तुला निवडून घेतले आहे म्हणून असे होईल.”