Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पाहा, रोष व तीव्र क्रोध ह्यांनी कठोर झालेला असा परमेश्वराचा दिवस येत आहे; तो देश उजाड करून सोडील, त्यातील पातक्यांचा संहार करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 पाहा, क्रोध आणि संतापाने भरून वाहणारा रोष, असा परमेश्वराचा दिवस येत आहे अशासाठी की देश उजाड आणि तिच्यातून पाप्यांचा नाश करायला येत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पाहा, याहवेहचा दिवस येत आहे —एक कठोर दिवस, क्रोधाचा आणि घोर संतापाचा— भूमी उजाड करण्यासाठी आणि तेथील पापी लोकांचा नाश करण्यासाठी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:9
27 Iomraidhean Croise  

पृथ्वीवरून पातकी नष्ट होवोत; ह्यापुढे दुर्जन न उरोत. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. परमेशाचे स्तवन करा!1


दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल, अनाचार्‍यांचे त्यातून निर्मूलन होईल.


आक्रोश करा, कारण परमेश्वराचा दिवस समीप आला आहे; सर्वसमर्थाकडून हा एक विनाशच येत आहे.


गर्विष्ठ, उन्मत्त व चढेल अशा सर्वांसाठी सेनाधीश परमेश्वराने दिवस नेमला आहे; त्या दिवशी ते नीच होतील.


सीयोनेला न्याय मिळावा म्हणून सूड घेण्याचा हा परमेश्वराचा दिवस, प्रतिफळ देण्याचे हे वर्ष होय.


कारण सूड घेण्याचा दिवस मी आपल्या मनात योजला होता, माझ्या उद्धारकार्याचे वर्ष आले आहे.


बागेच्या मध्यभागी असलेल्या मूर्तीच्या मागे लागावे म्हणून जे आपणांस पवित्र व शुद्ध करतात व डुकराचे मांस, अमंगळ पदार्थ व उंदीर खातात ते सगळे एकदम विलयास जातील, असे परमेश्वर म्हणतो.


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


परमेश्वराच्या दिवशी युद्धाला तोंड देण्यास तुम्ही खिंडारात उभे राहत नाही आणि इस्राएल घराण्याचा तट तुम्ही नीट बांधून काढत नाही.


कारण दिवस समीप आला आहे; परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे; तो अभ्रमय दिवस आहे; तो विधर्म्याचा शासनदिन आहे.


त्या दिवसाबद्दल हायहाय करा! भयंकर दिवस! परमेश्वराचा दिवस जवळ येऊन ठेपला आहे, सर्वसमर्थाकडून विनाशमय असा तो येत आहे.


सीयोनात कर्णा वाजवा, माझ्या पवित्र पर्वतावर नौबत वाजवा; देशात राहणारे सर्व थरथर कापोत, कारण, परमेश्वराचा दिवस येत आहे, तो येऊन ठेपला आहे.


परमेश्वराचा महान व भयंकर दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.


परमेश्वर ईर्ष्यावान व झडती घेणारा देव आहे; परमेश्वर सूड घेणारा व क्रोधाविष्ट आहे; परमेश्वर आपल्या विरोध्यांचे पारिपत्य करणारा आहे; तो आपल्या शत्रूंविषयी मनात क्रोध वागवतो.


त्याच्या रागापुढे कोण टिकणार? त्याच्या क्रोधाच्या संतापापुढे कोण उभा राहणार? त्याच्या संतापाचा वर्षाव अग्नीसारखा होतो, त्याच्यापुढे खडक फुटून त्यांचे तुकडे होतात.


तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करील व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावील.


हा संतापाचा दिवस आहे, दुःखाचा व क्लेशाचा दिवस आहे, विध्वंसाचा व उजाडीचा दिवस आहे, अंधकाराचा व उदासीनतेचा दिवस आहे, अभ्रांचा व निबिड अंधकाराचा दिवस आहे.


पाहा, परमेश्वराचा दिवस येत आहे; त्या दिवशी तुझी लूट तुझ्या वस्तीत वाटून घेतील.


पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे; सर्व गर्विष्ठ व सर्व दुराचारी धसकट बनतील; तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan