Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ऐका, एखाद्या मोठ्या राष्ट्रासारखा गोंगाट डोंगरावर होत आहे! एकत्र झालेल्या राष्ट्रसमूहाचा गलबला होत आहे! सेनाधीश परमेश्वर युद्धासाठी सैन्याची पाहणी करीत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अनेक लोकांच्या समुदायाच्या गोंगाटाप्रमाणे, अनेक राष्ट्रांच्या राजाच्या एकत्र जमल्याप्रमाणे डोंगरात गलबला होत आहे. सेनाधीश परमेश्वर लढाईसाठी फौज तयार करत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 ऐका, डोंगरावरील एक आवाज, मोठ्या लोकसमुदायासारखा आवाज! ऐका, राज्यांमध्ये चालू असलेला गोंधळ, राष्ट्रे एकत्र जमत असल्यासारखा आवाज! सर्वसमर्थ याहवेह, युद्धासाठी सैन्य जमा करीत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:4
23 Iomraidhean Croise  

अरेरे, बहुत राष्ट्रांचा केवढा हा गलबला! समुद्राच्या गर्जनेसारखा ते गलबला करतात; केवढी ही राष्ट्रांची खळबळ! ती महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात!


तुम्ही सर्व जमा व्हा, ऐका; त्या मूर्तींपैकी कोणी ह्या गोष्टी कळवल्या? परमेश्वराला प्रिय असलेला मनुष्य आपल्या इच्छेप्रमाणे बाबेलचे करील; तो आपले भुजबल खास्द्यांवर चालवील.


तो दूरच्या राष्ट्रांसाठी निशाण उभारतो व शीळ घालून दिगंतापासून त्यांना बोलावतो; पाहा, ते त्वरा करून धावत येत आहेत.


त्या दिवशी समुद्रगर्जनेप्रमाणे ते त्यांच्यावर गर्जना करतील; भूमीकडे पाहावे तर अंधकार व संकट; तेथील अभ्रांमुळे प्रकाश जाऊन काळोख होईल.


‘इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, पाहा, तटाबाहेर तुम्हांला वेढा घालणारा बाबेलचा राजा व खास्दी लोक ह्यांच्याशी ज्या शस्त्रांनी तुम्ही लढत आहात ती मी उलटवीन आणि त्यांना ह्या नगरामध्ये एकत्र करीन.


त्यांच्याकडूनही अनेक राष्ट्रे व थोर राजे दास्य करवून घेतील; मी त्यांच्या कृतींप्रमाणे व त्यांच्या हातच्या कर्मांप्रमाणे त्यांना प्रतिफळ देईन.


मी तुमच्यावर पाठवलेले आपले महासैन्य म्हणजे झुंडींनी येणारे टोळ, चाटून खाणारे टोळ, अधाशी टोळ व कुरतडणारे टोळ ह्यांनी ज्या वर्षांचे उत्पन्न खाल्ले त्यांची तुम्हांला भरपाई करून देईन.


लोकांच्या झुंडी, निर्णयाच्या खोर्‍यात लोकांच्या झुंडी आहेत. कारण निर्णयाच्या खोर्‍यात परमेश्वराचा दिवस येऊन ठेपला आहे.


ह्यामुळे तिच्या पीडा म्हणजे मरण, दुःख व दुष्काळ ‘एका दिवशीच येतील,’ आणि ती अग्नीत जाळून टाकली जाईल; कारण तिचा ‘न्यायनिवाडा करणारा प्रभू’ देव ‘सामर्थ्यवान’ आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan