Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 रानकुत्री त्यांच्या किल्ल्यांत, कोल्ही त्यांच्या मनोरम महालात ओरडतील;तिचा काळ जवळ आला आहे; तिचे आयुर्दिन वाढवले जाणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 तरस त्यांच्या किल्ल्यात आणि कोल्हे त्याच्या सुंदर महालात ओरडतील. तिची वेळ जवळ आली आहे आणि तिच्या दिवसास विलंब लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील, कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील. तिची वेळ फार जवळ आली आहे, आणि तिचे दिवस लांबणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:22
19 Iomraidhean Croise  

तरी तू आम्हांला कोल्हे राहतात त्या ठिकाणी ठेचले, मृत्युच्छायेने आच्छादले.


तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.


कारण राजभुवन ओस होईल, गजबजलेले शहर सुने पडेल; टेकडी व टेहळणीचा बुरूज ही सदासर्वदा गुहा बनतील, तेथे रानगाढवांचे क्रीडास्थान व कळपांची चरण होईल.


त्याच्या राजवाड्यात काटेरी झुडपे उगवतील व त्याच्या किल्ल्यात खाजकुईली व काटेझाडे उगवतील; तो कोल्ह्यांचे वसतिस्थान व शहामृगांचे अंगण होईल.


तेथे वनपशू कोल्ह्यांना भेटतील, बोकडरूपी पिशाच्च आपल्या सोबत्यास हाक मारील; निशाचरही तेथे राहून आराम पावेल.


जेथे मृगजल दिसते तेथे तलाव होईल; तृषित भूमीच्या ठिकाणी उसळत्या पाण्याचे झरे होतील; कोल्हे राहतात त्या स्थळी बोरू व लव्हाळे ह्यांसहित गवत उगवेल.


वनपशू, कोल्हे व शहामृग माझे स्तवन करतील; कारण मी आपल्या लोकांना, आपल्या निवडलेल्यांना, पिण्यासाठी अरण्यात जले, मरुभूमीत नद्या देणार;


मवाबावर अरिष्ट येऊन ठेपले आहे, त्याची विपत्ती त्वरा करत आहे.


कारण सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव असे म्हणतो, धान्य मळण्याच्या वेळी खळे असते तशी बाबेलकन्या आहे; अजून थोडा अवधी आहे म्हणजे मग तिचा हंगाम येईल.


यरुशलेम ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान असे मी करीन; यहूदाची नगरे ओसाड, निर्जन करीन.”


कोल्हीदेखील आपले स्तन आपल्या पिलांना पाजते; पण माझ्या लोकांची कन्या रानातील शहामृगाप्रमाणे क्रूर झाली आहे!


ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.


कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटास जाण्यास आपणच नेट करत आहे, तो फसवायचा नाही; त्याला विलंब लागला, तरी त्याची वाट पाहा; तो येईलच, त्याला विलंब लागायचा नाही.


गुरामेंढरांचे कळप, भूतलावरील सर्व पशू तिच्यामध्ये वसतील; पाणकोळी व साळू तिच्या खांबांच्या शिरोभागी राहतील; त्यांचे घुमणे खिडक्यांतून ऐकू येईल; उंबरठे ओस पडतील, कारण त्याने गंधसरूचे लाकूडकाम उघडे केले आहे,


सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’


ते लोभ धरून बनावट गोष्टी सांगतील आणि तुमच्यावर पैसे मिळवतील; त्यांच्याकरता नेमलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करत नाही, आणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan