Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्यात पुन्हा कधी वस्ती होणार नाही, पिढ्यानपिढ्या त्यात कोणी राहणार नाही; अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत; मेंढपाळ आपले कळप तेथे बसवणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 ती कधी वसविली जाणार नाही आणि पिढ्यानपिढ्यापासून तिच्यामध्ये कोणी राहणार नाहीत. अरब आपले तंबू तेथे ठोकणार नाहीत किंवा मेंढपाळ आपले कळप तेथे विसाव्यास नेणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 तिच्यात कोणी कधीही वसती करणार नाही किंवा पिढ्यान् पिढ्या रहिवास करणार नाही; कोणीही अरब त्यांचे तंबू तिथे ठोकणार नाहीत, तिथे कोणीही मेंढपाळ त्यांच्या कळपांना विश्रांती देणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:20
20 Iomraidhean Croise  

कित्येक पलिष्ट्यांनी यहोशाफाटास भेटी व खंडणी म्हणून चांदी आणली; अरबी लोक सात हजार सातशे मेंढरे व सात हजार सातशे बकरी ह्यांचे कळप घेऊन त्याच्याकडे आले.


पाहा! ती रात्र निष्फळ असो; तिच्यात आनंदघोषाचा प्रवेश न होवो.


माझ्या प्राणसख्या, मला सांग : तू आपला कळप कोठे चारतोस? दुपारी तो कोठे बसवतोस? तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत राहावे?


तो साळूचे वतन व पाणथळ होईल असेही मी करीन; नाशरूप झाडूने मी त्यास झाडून टाकीन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.”


समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


तू शहराला मोडतोडीचा ढीग बनवले आहेस; तटबंदीचा गाव धुळीस मिळवला आहेस; विदेशीयांच्या महालांनी भरलेले शहर नष्ट केले आहेस; त्याचा कधी जीर्णोद्धार होणार नाही.


त्याने त्यांच्यासाठी चिठ्ठी टाकली आहे, त्याने आपल्या हाताने मापनसूत्र लावून देश त्यांना वाटून दिला आहे; ते त्याचे सर्वकाळचे वतनदार होतील, ते पिढ्यानपिढ्या त्यात राहतील.


हासोर हे कोल्ह्याचे वसतिस्थान होईल, कायमचे ओसाड होईल; तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्‍हाड करणार नाही.”


परमेश्वराच्या संतापामुळे ते निर्जन होईल, ते अगदी ओसाड होईल; प्रत्येक येणाराजाणारा बाबेलविषयी विस्मित होईल व त्याच्या सर्व क्लेशांस्तव त्याचा उपहास करील.


मराथाईम (अत्यंत बंडखोर देश) ह्यावर चढाई कर, आणि पकोडच्या (समाचार घ्यायच्या देशाच्या) रहिवाशांवर चढाई कर; त्यांची नासधूस कर, त्यांच्या पाठीस लागून त्यांचा समूळ नाश कर, असे परमेश्वर म्हणतो; मी तुला आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही कर.


कारण त्याच्यावर उत्तरेकडून एक राष्ट्र चढाई करून आले आहे; ते त्याचा देश ओसाड करील, त्यात एकही रहिवासी उरणार नाही; मनुष्यापासून पशूपर्यंत सर्व पळाले आहेत, निघून गेले आहेत.


ह्यास्तव वनपशू रानकुत्र्यांसह तेथे राहतील, शहामृग तेथे राहतील; तेथे कधीही वस्ती होणार नाही; पिढ्यानपिढ्या तेथे कोणी वस्ती करणार नाही.


ह्यामुळे परमेश्वराने बाबेलविरुद्ध केलेला संकल्प व खास्द्यांच्या देशाविरुद्ध केलेल्या योजना ऐकून घ्या; ते त्यांना, कळपातील लहानांनादेखील निश्‍चये ओढत नेतील; त्यांची वस्ती खातरीने त्यांच्यामुळे विस्मय पावेल.


हे सर्व पृथ्वीचा नाश करणार्‍या विध्वंसगिरी, पाहा, परमेश्वर म्हणतो, मी तुझ्याविरुद्ध आहे; मी आपला हात तुझ्यावर उगारीन, तुझा कडेलोट करीन, जळून कोळ झालेल्या पर्वतासमान मी तुला करीन.


पृथ्वी कापत आहे, वेदना पावत आहे; कारण बाबेल देश उजाड, निर्जन करण्याचे परमेश्वराचे संकेत पूर्ण होत आहेत.


बाबेल नासाडीचा ढिगार, कोल्ह्यांचे वसतिस्थान, विस्मय, व उपहास ह्यांचा विषय आणि निर्जन स्थळ असा होईल.


त्याची नगरे ओस पडली आहेत. त्यांतला प्रदेश निर्जल झाला आहे, तेथली भूमी रुक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही, व त्यातून कोणी मानवपुत्र येत-जात नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan