Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 हुसकलेला हरिण, मेंढपाळावाचून मेंढरांचा कळप, ह्यांसारखे ते होतील; प्रत्येक जण आपल्या लोकांकडे धाव घेईल; प्रत्येक जण आपल्या देशाकडे पळून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 शिकारी झालेल्या हरिणाप्रमाणे किंवा मेंढपाळ नसलेल्या मेंढराप्रमाणे, प्रत्येक मनुष्य आपल्या स्वतःच्या लोकाकडे वळेल आणि आपल्या देशाकडे पळून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 शिकार केलेल्या छोट्या हरिणीप्रमाणे, जसे मेंढपाळ नसलेले मेंढरू, सर्व त्यांच्या त्यांच्या लोकांकडे परत जातील, ते त्यांच्या मातृभूमीत पळून जातील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:14
13 Iomraidhean Croise  

मग तो म्हणाला, “सर्व इस्राएल लोक मेंढपाळावाचून असलेल्या मेंढरांसारखे डोंगरावरून विखरले आहेत असे मला दिसले; तेव्हा परमेश्वर म्हणाला, ह्यांना कोणी धनी नाही, तर हे आपापल्या घरी सुखरूप परत जावोत.”


सूर्यास्ताच्या समयी सर्व सैन्यात असा पुकारा झाला की, “प्रत्येकाने आपापल्या नगराची व आपापल्या देशाची वाट धरावी.”


राष्ट्रे महापुराच्या खळखळीसारखी खळबळ करतात; परंतु तो त्या खळबळीस प्रतिरोध करील व ती नाहीशी होईल; डोंगरांवरचे भूस व वावटळीतील धूळ ही वार्‍यापुढे उडून जातात तशी ती नष्ट होईल.


तलवारी, उपसलेल्या तलवारी, वाकवलेले धनुष्य व घोर संग्राम ह्यांपासून ते पळत आहेत.


तू ज्यांच्यासाठी शिणलीस त्या तुझ्या लोकांची अशी गत झाली आहे; तुझ्या तारुण्यापासून तुझ्याबरोबर व्यापार करणारे भटकत भटकत आपापल्या स्थानी जात आहेत; तुझा बचाव करणारा कोणी नाही.


तथापि सत्तर वर्षे भरल्यावर असे होईल की बाबेलचा राजा, तेथील लोक व खास्द्यांचा देश ह्यांना त्यांच्या दुष्कर्माचे प्रतिफळ मी देईन व तो देश कायमचा ओसाड करीन, असे परमेश्वर म्हणतो.


बाबेलातला पेरणारा, कापणीच्या वेळी विळा चालवणारा नाहीसा करा; जोरदार तलवारीपुढे प्रत्येक जण आपल्या लोकांकडे वळेल, प्रत्येक जण स्वदेशाकडे धाव घेईल.


आम्ही बाबेलास बरे करण्याचा प्रयत्न केला, पण तो बरा झाला नाही; त्याला सोडून द्या; चला, आपण सर्व आपापल्या देशाला जाऊ; कारण त्याचा गुन्हा गगनापर्यंत पोहचला आहे, आकाशापर्यंत चढला आहे.


अश्शूरच्या राजा, तुझे मेंढपाळ झोपी गेले आहेत; तुझे सरदार स्वस्थ पडले आहेत; तुझे लोक डोंगरावर पसरले आहेत; कोणी त्यांना एकत्र करत नाही.


तेव्हा लोकसमुदायांना पाहून त्यांचा त्याला कळवळा आला, कारण ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ ते गांजलेले व पांगलेले होते.


येशू मचव्यातून उतरला तेव्हा त्याने लोकांचा मोठा समुदाय पाहिला; ते तर ‘मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे’ होते, म्हणून त्याला त्यांचा कळवळा आला; आणि तो त्यांना बर्‍याच गोष्टींविषयी शिक्षण देऊ लागला.


कारण तुम्ही मेंढरांसारखे भटकत होता; परंतु आता तुमच्या जिवांचा मेंढपाळ व संरक्षक1 ह्याच्याकडे तुम्ही परत फिरला आहात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan