Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 मी आकाश कंपायमान करीन व पृथ्वी स्थानभ्रष्ट होईल; सेनाधीश परमेश्वराचा कोप व त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस ह्यांमुळे असे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 म्हणून मी आकाश हादरून सोडील, व पृथ्वी तिच्या स्थानावरून हालविली जाईल, सेनाधीश परमेश्वराचा संताप आणि त्याच्या तीव्र क्रोधाचा दिवस येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 म्हणून सर्वसमर्थ याहवेह यांच्या क्रोधाने आणि त्यांच्या क्रोधाग्नीच्या दिवशी मी आकाशे थरथर कापतील असे करेन; पृथ्वी तिच्या जागेवर हादरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:13
27 Iomraidhean Croise  

तो पृथ्वीस कापवून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात.


तेव्हा पृथ्वी हादरली व कंपित झाली, पर्वताचे पाये डळमळले, त्यांना झोके बसले, कारण तो संतप्त झाला होता.


तुझा क्रोध माझ्यावर ओढवला आहे; तुझ्या धाकाने मी केवळ नष्टप्राय झालो आहे.


परमेश्वर पृथ्वीस भयकंपित करण्यास उठेल तेव्हा त्याच्या भयप्रद दृष्टीपुढून व त्याच्या ऐश्वर्याच्या प्रतापापुढून लोक खडकांतल्या गुहांत व भूमीच्या विवरांत शिरतील.


समुद्रालगतच्या रानाविषयीची देव वाणी : दक्षिणेकडून जशा वावटळी झपाट्याने येतात, तसे रानातून, भयानक देशातून अरिष्ट येते.


परमेश्वराने आपला हात समुद्रावर उगारला आहे; त्याने राष्ट्रांना थरथर कापवले आहे; त्याने कनानासंबंधाने अशी आज्ञा केली आहे की त्याचे दुर्ग नष्ट करावे.


पाहा, परमेश्वर पृथ्वी रिक्त करीत आहे, तिला ओसाड करीत आहे, तिला विरूप करीत आहे व तिच्या रहिवाशांची दाणादाण करीत आहे.


असे होईल की दरार्‍याच्या शब्दामुळे पळणारा खाड्यात पडेल, खाड्यातून निभावलेला पाशात सापडेल; कारण आकाशाची द्वारे उघडली आहेत, पृथ्वीचे आधार हालत आहेत.


भूमी अगदी फाटून गेली आहे, भूमी साफ फुटून गेली आहे, भूमी अतिशय हादरून गेली आहे.


आकाशातील सर्व सेना गळून पडेल, आकाश गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल; द्राक्षवेलीचे पान सुकून पडते, अंजिराचा सुकलेला पाला गळतो, त्याप्रमाणे ती सेना समूळ गळून पडेल.


अगे बाबेलच्या कुमारिके, खाली उतरून धुळीत बस; खास्द्यांच्या कन्ये, सिंहासन सोडून भूमीवर बस, कारण तुला ह्यापुढे नाजूक व सुकुमार म्हणणार नाहीत.


वर आकाशाकडे आपले डोळे लावा, खाली पृथ्वीकडे लक्ष द्या; कारण आकाश धुराप्रमाणे विरून जाईल, पृथ्वी वस्त्राप्रमाणे जीर्ण होईल, तिचे रहिवासी चिलटांप्रमाणे मरतील; तरी माझे तारण सर्वकाळ टिकेल, माझा न्याय भंग पावणार नाही.


सेनाधीश परमेश्वराच्या क्रोधाने भूमी जळून खाक झाली आहे; लोकही जसे काय अग्नीला सरपण झाले आहेत; आपल्या भावालाही कोणी सोडत नाही.


परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी बाबेलवर व लेब-कामाईच्या1 रहिवाशांवर एका विध्वंसकाच्या मनास प्रवृत्त करीत आहे.


“येणार्‍याजाणार्‍यांनो, हे पाहून तुम्हांला काहीच वाटत नाही काय? परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दु:ख दिले; ह्या माझ्या दु:खासारखे दुसरे कोणतेही दु:ख आहे काय, हे लक्षपूर्वक पाहा.


परमेश्वर सीयोनेतून गर्जना करतो; यरुशलेमेतून आपला शब्द ऐकवतो, आकाश व पृथ्वी थरथर कापत आहेत, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे, इस्राएल लोकांचा दुर्ग आहे.


त्या दिवसांतील संकटांनंतर लगेचच ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, तारे आकाशातून पडतील, व आकाशाची बळे डळमळतील;’


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील परंतु माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.


तरी रात्री चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तप्त होऊन लयास जातील, आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील.1


‘नंतर’ मोठे पांढरे ‘राजासन’ व त्यावर ‘बसलेला’ एक जण ‘माझ्या दृष्टीस पडला;’ त्याच्या ‘तोंडापुढून पृथ्वी’ व आकाश हे ‘पळाले; त्यांकरता ठिकाण उरले नाही.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan