Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 13:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बाबेलविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला दृष्टान्तात प्राप्त झालेली देववाणी :

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 आमोजाचा पुत्र यशया याने बाबेलाविषयी स्विकारलेली घोषणा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 आमोजाचा पुत्र यशायाहने बाबेलच्या विरोधात पाहिलेला दृष्टान्त:

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 13:1
34 Iomraidhean Croise  

तेव्हा येहूने आपला सरदार बिदकर ह्याला सांगितले, “त्याला उचलून इज्रेली नाबोथाच्या शेतात फेकून दे; त्याचा बाप अहाब ह्याच्यामागून तू आणि मी रथातून चाललो असता परमेश्वराने त्याला शासन सांगितले होते ते आठव;


यहूदाचे राजे उज्जीया, योथाम, आहाज व हिज्कीया ह्यांच्या काळात यहूदा व यरुशलेम ह्यांविषयी आमोजाचा पुत्र यशया ह्याला झालेला दृष्टान्त.


तेव्हा राष्ट्रांचा मुकुटमणी, खास्दी लोकांच्या ऐश्वर्याचे भूषण असा जो बाबेल त्याची, सदोम व गमोरा ह्यांचा देवाने सत्यानाश केला तेव्हाच्यासारखी स्थिती होईल.


आहाज राजा मरण पावला त्या वर्षी ही देववाणी प्राप्त झाली :


मवाबाविषयीची देववाणी : एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले; एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले.


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


त्या वेळी आमोजाचा पुत्र यशया ह्याच्या द्वारे परमेश्वर म्हणाला : “जा, आपल्या कंबरेचे गोणपाट सोडून टाक, आपल्या पायातला जोडा काढ.” त्याने तसे केले; तो उघडा व अनवाणी चालला.


अरबस्तानाविषयीची देववाणी : ददानीच्या काफल्यांनो, तुम्हांला अरबस्तानातील रानात रात्र कंठावी लागेल.


दृष्टान्ताचे खोरे ह्याविषयीची देववाणी : तुम्ही सर्व धाब्यावर चढला त्या तुम्हांला काय झाले?


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी मजबूत ठिकाणी बसेलली खुंटी ढळेल; ती कापली जाऊन खाली पडेल व तिच्यावरील भार छेदला जाईल;’ कारण परमेश्वर हे बोलला आहे.”


परमेश्वर, तुमचा उद्धार करणारा, इस्राएलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, “तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे; मी तेथील सर्व खास्द्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळायला लावीन.


यहोयाकीम ह्याचा पुत्र यकोन्या जो यहूदाचा राजा त्याला व यहूदाचे सरदार, कारागीर व लोहार ह्यांना नबुखद्रेस्सराने धरून यरुशलेमेतून बाबेलास नेल्यानंतर परमेश्वराने मला हे दाखवले; पाहा, परमेश्वराने मंदिरासमोर अंजिराच्या दोन टोपल्या ठेवल्या होत्या.


माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले त्यांनी, अनेक देश व मोठी राज्ये ह्यांच्यावर लढाई, अरिष्ट व मरी येईल असा त्यांच्याविरुद्ध संदेश दिला.


बाबेलविषयी : खास्द्यांच्या देशाविषयी परमेश्वर जे वचन यिर्मया संदेष्ट्यांच्या द्वारे बोलला ते हे :


‘निंदा आमच्या कानी पडली म्हणून आम्ही लज्जित झालो आहोत; परमेश्वराच्या मंदिरातल्या पवित्रस्थानात परके आले आहेत; म्हणून लज्जेने आमची मुखे व्याप्त झाली आहेत.’


त्यांना साग : ‘प्रभू परमेश्वर म्हणतो की हे देववचन यरुशलेमेतील अधिपतीस व ज्या इस्राएल घराण्यातले ते आहेत त्या सर्व घराण्यास लागू आहे.’


परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.”


तेव्हा राजाची मुद्रा पालटली व तो चिंताक्रांत झाला; त्याच्या कंबरेचे सांधे ढिले पडले, आणि त्याचे गुडघे लटपटू लागले.


निनवेविषयीची देववाणी : नहूम एल्कोशकर ह्याला प्राप्त झालेल्या दृष्टान्ताचे पुस्तक.


हबक्कूक संदेष्ट्याला दृष्टान्ताने प्राप्त झालेले देववचन :


इस्राएलाविषयी परमेश्वराची वाणी : आकाश पसरणारा, पृथ्वीचा पाया घालणारा व मनुष्याच्या अंतर्यामी आत्मा निर्माण करणारा परमेश्वर म्हणतो :


हद्राख देशाविषयी परमेश्वराची वाणी : ती दिमिष्कास पोचवून तेथे स्थिर होईल; कारण परमेश्वराची नजर मनुष्यजातीकडे व इस्राएलाच्या सर्व वंशांकडे आहे;


मलाखीच्या द्वारे इस्राएलास प्राप्त झालेले परमेश्वराचे वचन.


आणि बाबेलास देशांतर झाले त्या वेळी योशीयाला यखन्या व त्याचे भाऊ झाले.


त्या देवदूतामागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला, “‘पडली, मोठी बाबेल पडली, तिने आपल्या’ जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी ‘द्राक्षारस सर्व राष्ट्रांना पाजला आहे.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan