Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 पाहा, देव माझे तारण आहे; मी भाव धरतो, भीत नाही; कारण प्रभू परमेश्वर1 माझे बल व गीत आहे; तो मला तारण झाला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 पाहा, देव माझे तारण आहे; मी त्याजवर भाव ठेवीतो व भिणार नाही, कारण परमेश्वर, होय परमेश्वर माझे बल व गीत आहे. तो माझे तारण झाला आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 निश्चितच परमेश्वर माझे तारण आहेत; मी भरवसा ठेवेन आणि घाबरणार नाही. याहवेह, याहवेह स्वतः माझे सामर्थ्य आणि माझे संरक्षण आहेत; ते माझे तारण झाले आहेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 12:2
41 Iomraidhean Croise  

इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास.


ह्यातच माझे तारण होईल; कारण भक्तिहीन त्याच्यासमोर येणार नाही.


त्याचे मन स्थिर असते, आपल्या शत्रूंची गत आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो भिणार नाही.


परमेश माझे बल व माझे गीत आहे; तो माझे तारण झाला आहे.


तू माझे ऐकले आहे, तू माझे तारण झाला आहेस, म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.


परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे; मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे मी कोणाचे भय धरू?


तू पराक्रमाने कंबर बांधून आपल्या सामर्थ्याने पर्वत स्थिर ठेवतोस.


देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे.


देव निश्‍चये आपल्या वैर्‍यांचे मस्तक फोडील, जो आपल्या दुष्टाईत निमग्न होऊन चालतो त्याचे केसाळ माथे फोडील.


म्हणजे तू, केवळ तूच, परमेश्वर3 ह्या नावाने सर्व पृथ्वीवर परात्पर आहेस असे त्यांना कळू दे.


परमेश (याह) माझे बल, माझा स्तोत्रविषय आहे, तो माझा उद्धारक झाला आहे; हाच माझा देव, स्तवनाने मी ह्याला सुशोभित करीन; हाच माझ्या पित्याचा देव मी ह्याचा महिमा गाईन.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे माझे सीयोननिवासी प्रजे, अश्शूर मिसराप्रमाणे तुला दंडाने ताडन करील व तुझ्यावर सोटा उचलील, तरी त्याला भिऊ नकोस.


कारण तू आपल्या तारणकर्त्या देवाला विसरलास व आपल्या आश्रयाच्या दुर्गाचे स्मरण केले नाहीस; म्हणून तू मनोरम झाडांची2 लागवड केली व परदेशीय3 द्राक्षलतेची कलमे लावलीस;


पण त्याने माझा आश्रय धरावा; त्याने माझ्याबरोबर दोस्ती करावी, माझ्याबरोबर दोस्ती करावी.”


वार्‍यापासून आसरा व वादळापासून निवारा असा मनुष्य होईल; रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाल खडकाची छाया असा तो होईल.


कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे, परमेश्वर आमचा नियंता आहे, परमेश्वर आमचा राजा आहे; तो आम्हांला तारील.


परमेश्वर मला तारण्यास सिद्ध आहे; म्हणून आम्ही आपली तंतुवाद्ये वाजवू; ती सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात वाजवू.”


इस्राएलास परमेश्वराकडून सर्वकाळचा उद्धार प्राप्त झाला आहे; तुम्ही अनंतकाळ लज्जित व फजीत होणार नाही.


मी याकोबाला त्याच्याकडे परत आणावे, त्याच्याजवळ इस्राएल एकत्र जमवावे म्हणून आपला सेवक होण्यासाठी ज्या परमेश्वराने मला गर्भाशयात घडले, ज्या परमेश्वराच्या दृष्टीने मला मान मिळाला व जो माझा देव माझे सामर्थ्य झाला,


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


“तुमचे सांत्वन करणारा मी, केवळ मीच आहे; तू मर्त्य मनुष्याला, तृणवत मानवपुत्राला भितेस अशी तू कोण?


मी परमेश्वराच्या ठायी अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठायी माझा जीव उल्लासतो; कारण जसा नवरा शेलापागोटे लेऊन स्वत:ला याजकासारखा मंडित करतो व नवरी जशी अलंकारांनी स्वत:ला भूषित करते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसवली आहेत; मला नीतिमत्तेच्या झग्याने आच्छादले आहे.


पाहा, परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजवले आहे की, “सीयोनेच्या कन्येला म्हणा, ‘पाहा, तुझे तारण येत आहे; पाहा, वेतन त्याच्याजवळ आहे व पारिपत्य त्याच्यासमोर आहे.”’


परंतु जे मी उत्पन्न करतो त्याने तुम्ही सदा आनंदी व्हा व उल्लास पावा; पाहा, मी यरुशलेम उल्लासमय, तिचे लोक आनंदमय करतो.


ह्यास्तव प्रभू स्वत: तुम्हांला चिन्ह देत आहे; पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इम्मानुएल (आमच्यासन्निध देव) असे ठेवील.


त्याच्या दिवसांत यहूदा सुरक्षित होईल, इस्राएल निर्भय वसेल, व जे नाव त्याला देतील ते हे :‘परमेश्वर आमची नीतिमत्ता.’


टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.


तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, शद्रख, मेशख व अबेद्नगो ह्यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यांनी आपले देह अर्पण केले; त्यांना त्यांच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याचा धन्यवाद असो!


यहूदाच्या घराण्यावर मी दया करीन; त्यांचा देव परमेश्वर ह्याच्या हातून त्यांचा उद्धार करीन; धनुष्य, तलवार, लढाई, घोडे अथवा स्वार ह्यांच्या द्वारे हा उद्धार करणार नाही.”


सीयोनपुत्रहो, परमेश्वर तुमचा देव ह्याच्या ठायी उल्लास करा, हर्ष करा; कारण तुम्हांला हितकर होईल इतका आगोटीचा पाऊस1 तो देतो; तो पहिली पर्जन्यवृष्टी म्हणजे आगोटीचा व वळवाचा पाऊस पाडतो.


पण मी तुला आभारप्रदर्शनाचे यज्ञ करीन; मी केलेले नवस फेडीन; तारण परमेश्वरापासून होते.”


तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्‍या देवाविषयी मी उल्लास करीन.


कारण मला [ख्रिस्ताच्या] सुवार्तेची लाज वाटत नाही; कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला — प्रथम यहूद्याला मग हेल्लेण्याला — तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे.


सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे; तो1 देहाने प्रकट झाला, आत्म्याने नीतिमान ठरला, देवदूतांच्या दृष्टीस पडला, त्याची राष्ट्रांत घोषणा झाली, जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, तो गौरवात वर घेतला गेला.


ते उच्च स्वराने म्हणत होते : “राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकर्‍याकडून, तारण आहे!”


हन्ना हिने प्रार्थना केली ती ही : “परमेश्वराच्या ठायी माझे हृदय उल्लासत आहे; परमेश्वराच्या ठायी माझा उत्कर्ष झाला आहे; माझे मुख माझ्या शत्रूंविरुद्ध उघडले आहे. कारण तू केलेल्या उद्धाराने मला आनंद होत आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan