Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 11:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 परमेश्वराचे भय त्याचा हर्षोल्हास होईल; त्याच्या डोळ्यांनी काय पाहिले त्यावरून तो न्याय करणार नाही, त्याच्या कानांनी काय ऐकले यावरुन तो निर्णय करणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 आणि ते याहवेहचे भय बाळगण्यात आनंद मानतील. ते तोंडदेखला न्याय करणार नाहीत, किंवा कानाने ऐकलेल्या गोष्टीवरून ते निर्णय घेणार नाहीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 11:3
20 Iomraidhean Croise  

आपल्या दासीने विचार केला की, माझ्या स्वामीराजांच्या शब्दाने मला शांती मिळेल; कारण माझे स्वामीराजे ह्यांना देवदूताप्रमाणे बर्‍यावाइटाचा निर्णय करता येतो; तर आपला देव परमेश्वर आपल्याबरोबर असो.”


राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तू आपल्या घरी जा, मी तुझ्यासंबंधाने ताकीद देईन.”


राजाने हा न्याय केला तो सर्व इस्राएल लोकांच्या कानी गेला, तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्यबुद्धी उत्पन्न झाली; कारण न्यायनिवाडा करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यांना दिसून आले.


ह्यास्तव आपल्या सेवकाला तुझ्या लोकांचा न्याय करण्यासाठी सावधान चित्त दे म्हणजे मला बर्‍यावाइटाचा विवेक करता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे?”


जीभ अन्नाची रुची घेते, तसा कान शब्दांची पारख करीत नाही काय?


अन्नाची परीक्षा जशी जिभेला होते, तशी शब्दांची परीक्षा कानाला होते.


तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल, आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल.


नीतिमत्ता, न्याय व सात्त्विकता अशा सर्व सन्मार्गांची तुला जाणीव घडेल.


तुझ्या काळी स्थिरता वसेल; तारण, सुज्ञता व ज्ञान ह्यांचे वैपुल्य होईल; परमेश्वराचे भय त्याचा निधी होईल.


ही जमीन इस्राएलात अधिपतींचे वतन व्हावी, म्हणजे ह्यापुढे माझ्या अधिपतींनी माझ्या लोकांवर जुलूम करू नये; तर इस्राएल घराण्यातील निरनिराळ्या वंशाना दिलेली जमीन ज्याची त्याच्याकडे राहू द्यावी.


तो देशोदेशींच्या बहुत लोकांचा न्याय करील, दूर असलेल्या बलवान राष्ट्रांचा न्याय ठरवील, तेव्हा ते आपल्या तलवारी मोडून त्यांचे फाळ करतील, आपल्या भाल्यांचे कोयते करतील; ह्यापुढे एक राष्ट्र दुसर्‍या राष्ट्रावर तलवार उचलणार नाही; ते येथून पुढे युद्धकला शिकणार नाहीत.


येशू ज्ञानाने, शरीराने आणि ‘देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला.’


शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी ह्याची त्याला गरज नव्हती, कारण मनुष्यात काय आहे हे त्याला स्वतःला ठाऊक होते.


वरवर पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”


पण ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे अशा प्रौढांसाठी जड अन्न आहे.


पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, “तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंच काठीवर जाऊ नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan