Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 11:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ते पश्‍चिमेकडे पलिष्ट्यांच्या खांद्यावर (खालाटीवर) झडप घालतील; ते एकत्र होऊन पूर्वदेशीयांना लुटतील; अदोम व मवाब ह्यांना हस्तगत करतील; आणि अम्मोनी त्यांना वश होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 याउलट ते पश्चिमेकडील पलिष्ट्यांच्या टेकड्यांवर झडप घालतील, आणि एकत्रितपणे पूर्वेकडील लोकांस लुटतील. अदोम व मवाब यांच्यावर ते हमला करतील आणि अम्मोनाचे लोक त्यांच्या आज्ञा पाळतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 ते पश्चिमेला पलिष्ट्यांच्या उतारावर झेपावतील; एकत्र मिळून ते पूर्व दिशेकडील लोकांना लुटतील. एदोम आणि मोआब या देशांना ते जिंकून घेतील, आणि अम्मोनी लोक त्यांच्या अधीन होतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 11:14
30 Iomraidhean Croise  

“हे समग्र पलेशेथा, तुला मारणारा सोटा मोडला आहे म्हणून आनंद करू नकोस, कारण सापाच्या मुळातून फुरसे निघेल, त्याचे फळ उडता आग्या साप होईल.


मवाबाविषयीची देववाणी : एका रात्रीत मवाबाचे आर उजाड झाले, नष्ट झाले; एका रात्रीत मवाबाचे कीर उजाड झाले, नष्ट झाले.


आता परमेश्वर म्हणतो, “सालदाराच्या मुदतीप्रमाणे तीन वर्षांत मवाबाचे वैभव त्याच्या सगळ्या मोठ्या समुदायासह क्षीण होईल; त्याचा अवशेष राहील, पण तो अत्यल्प; म्हणण्यासारखा नसणार.”


परमेश्वराचा हात ह्या डोंगरावर राहील, व जसे शेणाच्या खाईतील रेंद्यात गवत तुडवतात तसे मवाबास जागच्या जागी तुडवतील.


अरे लुटार्‍या, तुला लुटले नाही; अरे ठका, तुला ठकवले नाही; तुला धिक्कार असो! तुझे लुटणे आटपले म्हणजे तुला लुटतील; तुझे ठकवणे आटपले म्हणजे तुला ठकवतील.


ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.


तुला पीडा करणार्‍यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील; तुला परमेश्वराचे नगर, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचे सीयोन म्हणतील.


अदोमाहून येत आहे हा कोण? लालभडक वस्त्रे लेऊन बसराहून येत आहे हा कोण? आपल्या वस्त्राभरणांनी भूषित होऊन, आपल्या पराक्रमाच्या आढ्यतेने डुलत येत आहे हा कोण? “जो नीतीने बोलणारा, जो तारण करण्यास समर्थ तो मी आहे.”


पूर्वेकडून अराम्यांना व पश्‍चिमेकडून पलिष्ट्यांना उठवील; ते तोंड पसरून इस्राएलास गिळून टाकतील. इतके झाले तरी त्याचा क्रोध शमला नाही, त्याचा हात अजून उगारलेला आहे.


त्याचप्रमाणे मवाबात अम्मोनी लोकांमध्ये, अदोमात व इतर सर्व देशांत जे यहूदी होते त्या सर्वांनी जेव्हा ऐकले की बाबेलच्या राजाने यहूदाचा अवशेष देशात राहू दिला आहे व त्यांच्यावर गदल्या बिन अहीकाम बिन शाफान नेमला आहे,


परमेश्वर म्हणतो, “पाहा, तो गरुडासारखा उडेल व मवाबावर आपले पंख पसरील.


ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत अम्मोन्यांचा राब्बा नगराविरुद्ध मी रणशब्द ऐकायला लावीन; ते नासाडीचा ढिगार होईल, तिच्या कन्यांना अग्नीने जाळतील; इस्राएल आपले वारस झालेल्यांचा वारस होईल, असे परमेश्वर म्हणतो.


पाहा, तो गरुडासारखा येऊन झडप घालील, तो बसर्‍यावर आपले पंख पसरील; त्या दिवशी अदोमाच्या वीरांचे मन वेणा देणार्‍या स्त्रीप्रमाणे होईल.”


केदार व हासोराची संस्थाने ह्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मारा केला त्याविषयी : परमेश्वर म्हणतो, उठा, केदारावर चढाई करा! पूर्वेच्या लोकांचा नाश करा!


मी आपले लोक इस्राएल ह्यांच्या हातून अदोमाचा सूड घेईन; माझ्या आवेशयुक्त क्रोधानुसार ते अदोमाची वाट लावतील; त्यांना माझ्या सुडाचा अनुभव येईल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.


तो वैभवी देशातही शिरेल; पुष्कळ देश पादाक्रांत होतील, पण अदोम, मवाब व अम्मोन येथील निवडक लोक हे त्याच्या हातातून सुटतील.


मिसर देश उजाड होईल व अदोम वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त पाडून यहूदाच्या वंशजांवर बलात्कार केला.”


मग ते अदोमाच्या अवशेषाचा व ज्यांना माझे नाव ठेवले आहे त्या सर्व राष्ट्रांचा ताबा घेतील,” असे हे कृत्य करणारा परमेश्वर म्हणतो.


त्यांचे घोडे चित्त्यांहून वेगवान आहेत व संध्याकाळी बाहेर पडणार्‍या लांडग्यांपेक्षा क्रूर आहेत; त्यांचे घोडेस्वार दौड करतात, त्यांचे घोडेस्वार दुरून येतात, खाऊन टाकण्यास त्वरा करणार्‍या गरुडासारखे ते धावतात.


समुद्रतीरीच्या रहिवाशांना, करेथी राष्ट्रांना धिक्कार असो! हे कनाना, पलिष्ट्यांच्या देशा, तुझ्याविरुद्ध परमेश्वराचे वचन आहे! मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवासी उरणार नाही.


तो प्रदेश यहूदी घराण्याच्या अवशेषासाठी होईल; तेथे ते आपली मेंढरे चारतील; अष्कलोनाच्या घरातून ते संध्याकाळी बिर्‍हाडास राहतील. कारण परमेश्वर त्यांचा देव त्यांना भेट देईल व त्यांचा बंदिवास उलटवील.


म्हणून सेनाधीश परमेश्वर, इस्राएलाचा देव, आपल्या जीविताची शपथ वाहून म्हणतो, “मवाब सदोमासारखे निश्‍चये होईल, अम्मोन वंशज गमोर्‍यासारखे होतील; खाजकुयरीचे वतन व मिठागर ही सर्वकाळ वैराण होतील; माझ्या लोकांचे अवशिष्ट जन त्यांना लुटतील; माझ्या राष्ट्रांचे अवशिष्ट राहिलेले लोक त्यांचा ताबा घेतील.”


मी त्याला पाहीन, पण तो आता दिसत नाही; त्याला न्याहाळीन, पण तो जवळ नाही; याकोबातून एक तारा उदय पावेल, आणि इस्राएलातून एक राजदंड निघेल, तो मवाबाचा कपाळमोक्ष करील, सर्व बंडखोरांना चीत करील.


मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील;


मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;


Lean sinn:

Sanasan


Sanasan