Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 11:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमार्‍याला राष्ट्रे शरण येतील; त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्यादिवशी, इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज निशानी असे उभे होईल. राष्ट्रे त्यास शोधून काढतील, आणि त्याचे विश्रामस्थान वैभवशाली होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 त्या दिवशी इशायाचे मूळ लोकांसाठी ध्वज म्हणून उभे राहील; राष्ट्रे त्यांच्याकडे एकत्र येतील आणि त्यांचे विश्रामस्थान गौरवशाली असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 11:10
46 Iomraidhean Croise  

यहूदाकडचे राजवेत्र ज्याचे आहे तो येईपर्यंत1 ते त्याच्याकडून जाणार नाही, राजदंड त्याच्या पायांमधून ढळणार नाही; राष्ट्रे त्यांची आज्ञांकित होतील.


बवाजाला ओबेद झाला व ओबेदाला इशाय झाला;


हे माझ्या जिवा, तू आपल्या विश्रामस्थानी परत ये, कारण परमेश्वराने तुझ्यावर पुष्कळ उपकार केले आहेत.


ते तुझ्या राज्याचा महिमा वर्णन करतात, आणि तुझा पराक्रम कथन करतात;


भक्त गौरवामुळे उल्लासोत; ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.


जो परात्पराच्या गुप्त स्थली वसतो, तो सर्वसमर्थाच्या सावलीत राहील.


तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल; त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे.


इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल; त्याच्या मुळांतून फुटलेली शाखा फळ देईल;


तो राष्ट्रांसाठी निशाण उभारील, व पृथ्वीच्या चार्‍ही दिशांकडून इस्राएलातल्या घालवून दिलेल्यांना एकत्र करील व यहूदातल्या परागंदा झालेल्यांना गोळा करील.


ज्या दिवशी तुझी पीडा, चिंता व तुझ्यावर लादलेले कठीण दास्य ह्यांपासून परमेश्वर तुला आराम देईल,


त्या दिवशी लोकांची उन्मत्त दृष्टी नीच होईल, माणसांचा गर्व उतरेल; व परमेश्वरच काय तो उच्च स्थानी विराजेल.


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


देशादेशांतील लोकांच्या झुंडी जातील व म्हणतील, “चला, आपण परमेश्वराच्या पर्वतावर याकोबाच्या देवाच्या मंदिराकडे चढून जाऊ; तो आम्हांला आपले मार्ग शिकवो, म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू.” कारण सीयोनेतून नियमशास्त्र व यरुशलेमेतून परमेश्वराचे वचन निघेल.


तो त्यांना म्हणाला होता, “ही विश्रांती आहे, भागलेल्यास विसावा द्या; त्याने त्याला आराम होईल,” तरी ते ऐकतना.


पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही, भंगणार नाही; द्वीपे त्याच्या नियमशास्त्राची प्रतीक्षा करतात.


प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी राष्ट्रांना आपल्या हाताने इशारा करीन, लोकांसमोर आपला झेंडा उभारीन; ते तुझ्या पुत्रांना आपल्या उराशी धरून आणतील; तुझ्या कन्यांना खांद्यांवर बसवून पोहचत्या करतील.


ते मावळतीपासून परमेश्वराच्या नामाचे भय बाळगतील, सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या प्रतापाचे भय बाळगतील; कारण शत्रू पाण्याच्या लोंढ्यासारखा येईल तेव्हा परमेश्वराचा आत्मा त्याच्याविरुद्ध झेंडा उभारील.


राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील.


हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल.


बाहेर पडा, वेशीतून बाहेर पडा; लोकांचा मार्ग नीट करा; राजमार्गाला भर घाला, घाला भर; धोंडे काढून टाका; अन्य राष्ट्रांसाठी ध्वजा उभारा.


मी त्यांना एक चिन्ह दाखवीन; त्याच्यातून जे वाचतील त्यांना मी तार्शीश, पूल व लूद अशा धनुर्धारी राष्ट्रांकडे पाठवीन; ज्यांनी माझे नाम ऐकले नाही, माझा महिमा पाहिला नाही, अशा तुबाल व यावान ह्या दूरच्या द्वीपांत मी त्यांना पाठवीन; ते अन्य राष्ट्रांत माझा महिमा प्रकट करतील.


परमेश्वर म्हणतो, “चवाठ्यावर उभे राहून पाहा आणि पुरातन मार्गांपैकी कोणता म्हणून विचारा; सन्मार्गाने चाला; अशाने तुमच्या जिवास विश्रांती मिळेल;” पण ते म्हणाले, ‘आम्ही चालणार नाही.’


ह्या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो; मी ह्या स्थळाला शांती देईन,”’ असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


तोच परमेश्वराचे मंदिर बांधील; तो वैभवशाली होईल; तो आपल्या सिंहासनावर बसून सत्ता चालवील; तो आपल्या सिंहासनावर याजकही होईल; ह्या दोहोंत शांततेची सल्लामसलत होईल.”’


मग इस्राएल लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन तीन दिवसांची वाट चालून गेले; त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरता परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांच्यापुढे त्या तीन दिवसांच्या प्रवासात होता.


आणि परराष्ट्रीय त्याच्या नावाची आशा धरतील.”


मी तुम्हांला सांगतो की, ‘पूर्वेकडून व पश्‍चिमेकडून’ पुष्कळ जण येतील आणि स्वर्गाच्या राज्यात अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांच्या पंक्तीस बसतील;


ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या ‘इस्राएल’ लोकांचे ‘वैभव’ असे आहे.”


आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईन.”


हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्‍चात्तापबुद्धी दिली आहे.”


म्हणून तुम्हांला ठाऊक असो की, ‘हे देवाने सिद्ध केलेले तारण परराष्ट्रीयांकडे’ पाठवले आहे; आणि ते ते श्रवण करतील.”


म्हणून त्याच्या विसाव्यात येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे; ह्यामुळे तुमच्यातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून आपण भिऊन वागू.


आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हांला पाचारण केले तो सर्व कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दु:ख सोसल्यावर, स्वतः तुम्हांला पूर्ण, दृढ व सबळ करील.


ह्या गोष्टींविषयी तुम्हांला साक्ष देण्याकरता मी येशूने आपल्या दूताला मंडळ्यांकरता पाठवले आहे. मी दाविदाचा ‘अंकुर’ आहे व त्याचे संतानही; मी पहाटचा तेजस्वी तारा आहे.”


तेव्हा वडीलमंडळापैकी एक जण मला म्हणाला, “रडू नकोस; पाहा, ‘यहूदा’ वंशाचा ‘सिंह’, दाविदाचा ‘अंकुर’ ह्याने जय मिळवला; म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan