Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 कालनो कर्कमीशासारखे, हमाथ अर्पादासारखे व शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 कालनो कर्कमीशासारखे नाही काय? हमाथ अर्पदासारखे नाही काय? शोमरोन दिमिष्कासारखे नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 ‘कालनो कर्कमीश सारखे नाही काय? हमाथ अर्पादसारखा आणि शोमरोन दिमिष्कसारखा नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:9
23 Iomraidhean Croise  

शिनार देशात बाबेल, एरक, अक्काद व कालने ही त्याच्या राज्याचा आरंभ होत.


दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले.


त्याचे मागणे मान्य करून अश्शूराच्या राजाने दिमिष्कावर चढाई करून ते घेतले व तेथील लोकांना पाडाव करून कीर येथे नेले; आणि रसीन ह्याचा वध केला.


अश्शूराच्या राजाने बाबेल, कूथा, अव्वा, हमाथ व सफरवाईम ह्या ठिकाणचे लोक आणून इस्राएल लोकांच्या जागी शोमरोनातील नगरांतून वसवले; शोमरोन ताब्यात घेऊन त्यातील नगरांत ते राहू लागले.


हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईम, हेना व इव्वा ह्यांचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?


माझ्या वाडवडिलांनी ज्या राष्ट्रांचा सर्वस्वी संहार केला त्यांच्या सर्व देवांपैकी आपल्या लोकांना माझ्या हातातून वाचवणारा असा कोणी देव होता काय? तर तुमचा देव तुम्हांला माझ्या हातातून कसा सोडवील?


त्यानंतर योशीयाने मंदिराची सिद्धता केल्यावर मिसरचा राजा नखो हा फरात नदीजवळील कर्कमीश नगरावर स्वारी करण्यास निघाला; तेव्हा योशीया त्याच्याशी सामना करण्यास गेला.


तो म्हणतो, “माझे सर्व सरदार राजे नाहीत काय?


दिमिष्काविषयीची देववाणी : पाहा, दिमिष्क हे नगर ह्या नावाला मुकले आहे; ते मोडतोडीचा ढीग बनले आहे.


एफ्राइमाची तटबंदी, दिमिष्काचे राज्य व अरामाचा अवशेष ही नाहीतशी होतील; इस्राएलाच्या वैभवाची गत झाली तशी त्यांची होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.


राजमार्ग ओस पडले आहेत, कोणी प्रवासी आढळत नाहीत; त्याने करार मोडला, नगराचा उपमर्द केला, मनुष्यांचा धिक्कार केला.


हमाथ व अर्पाद ह्यांचे देव कोठे आहेत? सफरवाईमचे देव कोठे आहेत? त्यांनी शोमरोन माझ्या हातून सोडवले आहे काय?


अश्शूरी राजांनी सर्व देशांचे काय केले ते पाहा! त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेच; तर तू सुटणार काय?


हमाथाचा राजा, अर्पादाचा राजा, सफरवाईम शहर, हेना व इव्वा ह्यांचा राजा हे कोठे आहेत?”’


अरामाचे शीर दिमिष्क व दिमिष्काचे शीर रसीन. (पासष्ट वर्षे झाली नाहीत तोच एफ्राईम भंग पावेल व त्याचे राष्ट्रत्व राहणार नाही.)


मिसराविषयी : मिसर देशाचा राजा फारो नखो ह्याचे सैन्य कर्कमीशाजवळ फरात नदीच्या काठी होते, यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने त्या सैन्याचा निःपात केला त्याविषयी :


दिमिष्काविषयी : “हमाथ व अर्पाद फजीत झाले आहेत; त्यांनी वाईट वर्तमान ऐकले आहे, त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले आहे; समुद्र क्षुब्ध झाला आहे; तो शांत होऊ शकत नाही.


(दिमिष्काच्या व हमाथाच्या सरहद्दींमधील) हमाथ, बेरोथा, सिब्राईम व हौरानाच्या सीमेवरील हासेर-हत्तीकोनपर्यंत.


ते तर राजांना कसपट समजतात व अधिपतींना कवडीमोल मानतात. कोणताही किल्ला असला, तरी तो ते तृणवत गणतात, कारण ते मातीचा ढीग रचून किल्ला सर करतात.


आणि होर पर्वतापासून हमाथाच्या वाटेपर्यंत रेषा आखून ती सदादापर्यंत न्यावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan