Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:32 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 त्याचा आजचा मुक्काम नोबास आहे; तो सीयोनकन्येच्या डोंगराला, यरुशलेमेच्या टेकडीला, हाताने धमकावत आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 आजच्या दिवशीच तो नोबास थांबेल सीयोन कन्येच्या डोंगराला, यरूशलेमेच्या टेकडीला आपल्या हाताची मूठ दाखवील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 आज ते नोब येथे थांबतील; सीयोन कन्येच्या डोंगराकडे, यरुशलेमच्या टेकडीकडे ते त्यांच्या मुठी वळवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:32
21 Iomraidhean Croise  

ह्या गोष्टी घडल्यावर व अशी निष्ठा प्रकट झाल्यावर अश्शूरचा राजा सन्हेरीब ह्याने येऊन यहूदात प्रवेश केला आणि तटबंदी नगरे जिंकून घेण्याच्या हेतूने त्याने त्यांच्यासमोर तळ दिला.


सन्हेरीब आला असून यरुशलेमेशी लढण्याचा त्याचा मानस आहे असे हिज्कीयाने पाहिले.


अनाथोथात, नोबात, अनन्यात,


सीयोनेची कन्या द्राक्षीच्या मळ्यातल्या खोपीसारखी, काकड्यांच्या बागेतल्या माचाळासारखी, वेढा पडलेल्या नगरासारखी राहिली आहे.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे माझे सीयोननिवासी प्रजे, अश्शूर मिसराप्रमाणे तुला दंडाने ताडन करील व तुझ्यावर सोटा उचलील, तरी त्याला भिऊ नकोस.


मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत.


परमेश्वर मिसरी समुद्राची खाडी नष्ट करील; तो आपला उष्ण श्वास सोडून आपला हात नदावर (फरातावर) परजील; त्यावर प्रहार करून त्याचे सात फाटे करील; त्यांवरून लोकांना जोडे घालून जाता येईलसे करील.


उघड्या डोंगरावर ध्वज उभारा, लोकांना मोठ्याने हाका मारा; हाताने खुणवा म्हणजे ते सरदारांच्या वेशीत प्रवेश करतील.


अधिपतीस पाठवायचा कोकरांचा नजराणा तुम्ही रानाजवळचे सेला येथून सीयोनकन्येच्या पर्वताकडे रवाना करा.


त्या काळी मिसरी लोक बायकांसारखे होतील; सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर आपला हात उगारील त्यामुळे ते थरथर कापतील व भयभीत होतील.


शेवटच्या दिवसांत असे होईल की परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वताच्या माथ्यावर स्थापण्यात येईल, आणि सर्व डोंगरांहून तो उंच होईल; त्याच्याकडे सर्व राष्ट्रांतील लोक लोटतील.


मग मी अरीएलांवर संकट आणीन; शोक व कण्हणे चालू होईल. तरीपण ते नगर मला अरीएलच असे होईल.


तर त्याच्याविषयी परमेश्वर वचन बोलला आहे की, ‘सीयोनेची कुमारी तुला तुच्छ लेखते व तुझा उपहास करते; यरुशलेमेची कन्या तू पाठमोरा झालेला पाहून आपले मस्तक हलवते.


त्याचा पूर यहूदावर येईल; त्यांना बुडवून तो पुढे वाहील; त्याचे पाणी लोकांच्या गळ्यापर्यंत येईल; हे इम्मानुएला, तो आपले पंख पसरून तुझी सर्व भूमी व्यापून टाकील.”


ते लोक धनुष्ये व भाले धारण करतात, ते क्रूर आहेत, त्यांना दयामाया नाही, ते सागराप्रमाणे गर्जना करतात; ते घोड्यांवर स्वार झाले आहेत; हे सीयोनकन्ये, ते युद्धास सिद्ध होऊन तुझ्याविरुद्ध एकजुटीने येत आहेत.”


कारण तिच्या जखमा असाध्य आहेत; हे अरिष्ट यहूदापर्यंत आले आहे, माझ्या लोकांच्या वेशीपर्यंत, यरुशलेमेपर्यंत आले आहे.


“पाहा, मी आपला हात त्यांच्यावर उगारीन, व त्यांची सेवा करणारे त्यांना लुटतील; तेव्हा तुम्हांला समजेल की, सेनाधीश परमेश्वराने मला पाठवले आहे.


दावीद नोब येथे अहीमलेख याजकाकडे आला; तेव्हा अहीमलेख थरथर कापत दाविदाला सामोरा येऊन म्हणाला, “तुम्ही एकटेच का? तुमच्याबरोबर कोणी मनुष्य नाही?”


दावीद अहीमलेख याजकाला म्हणाला, “राजाने मला काही कामगिरीवर पाठवले आहे, आणि मला सांगितले आहे की ज्या कामगिरीवर मी तुला पाठवत आहे आणि तुला जी आज्ञा मी देत आहे तिच्याविषयी कोणाला काही कळू देऊ नकोस, मला अमुक ठिकाणी येऊन भेटा असे मी आपल्या चाकरांना सांगितले आहे.


नोबावर तलवार चालवून पुरुष व स्त्रिया, मुले व तान्ही बाळे, बैल, गाढवे व मेंढरे ह्या सर्वांची त्याने कत्तल केली.


तेव्हा शौलाच्या नोकरांवर नेमलेला दवेग अदोमी म्हणाला, “मी इशायाच्या पुत्राला नोब येथे अहिटूबाचा पुत्र अहीमलेख ह्याच्याकडे येताना पाहिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan