Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने हेल काढून ओरड! हे लईशा, कान दे! बिचारे अनाथोथ!

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

30 गल्लीमाच्या कन्ये, मोठ्याने शोक कर! हे लईशा, लक्ष दे! तू बिचारी अनाथोथ!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

30 गल्लीमच्या मुली, आरडाओरडा करा! ऐक, लईशाह! गरीब बिचारा अनाथोथ!

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:30
9 Iomraidhean Croise  

अब्याथार याजकाला राजा म्हणाला, “तू अनाथोथ येथे आपल्या शेतीवाडीत जाऊन राहा; तू मरणदंडास पात्र आहेस तरी मी आज तुला मारून टाकत नाही, कारण माझा बाप दावीद ह्याच्यासमक्ष तू परमेश्वर देवाचा कोश वाहत असायचास आणि माझ्या बापाला ज्या ज्या विपत्ती प्राप्त झाल्या त्यांचा वाटेकरी तू होत असायचास.”


अनाथोथात, नोबात, अनन्यात,


मदमेना पळत आहे; गेबीमातील रहिवासी पळ काढण्यासाठी आपली मालमत्ता गोळा करत आहेत.


बन्यामीन प्रांतातील अनाथोथ येथल्या याजकांपैकी हिल्कीयाचा पुत्र यिर्मया ह्याची वचने :


तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे माझा चुलतभाऊ हानामेल माझ्याकडे पहारेकर्‍यांच्या चौकात आला; तो मला म्हणाला, ‘बन्यामिनाच्या प्रांतातील अनाथोथ येथले माझे शेत विकत घे; कारण ते वतन करून घेण्याचा व सोडवण्याचा हक्क तुझा आहे; तू ते आपल्यासाठी विकत घे.’ तेव्हा मी समजलो की हे परमेश्वराकडचे वचन आहे.


अनाथोथ व त्याचे गायरान आणि अलमोन व त्याचे गायरान अशी चार नगरे दिली.


त्यांनी त्या नगराला इस्राएलाचा एक मुलगा म्हणजे आपला पूर्वज दान ह्याचे नाव दिले. पूर्वी त्या नगराचे नाव लईश होते.


मग ते पाच पुरुष निघून लईश येथे गेले. तेथे त्यांना असे दिसून आले की, तेथील लोक सीदोनी लोकांप्रमाणे शांत व निश्‍चिंत आहेत; अन्नधान्याची त्यांना मुळीच वाण नसून ते धनवान आहेत; ते सीदोनी लोकांपासून दूर राहत असून अरामी लोकांशी त्यांचा काही संबंध नाही.


शौलाने आपली कन्या मीखल, जी दाविदाची स्त्री होती, तिला गल्लीमवासी लइशाचा पुत्र पालती ह्याला देऊन टाकले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan