Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 ते घाटांतून पार गेले; गेबा येथे मुक्काम करू असे ते म्हणत आहेत; रामा थरथर कापत आहे; शौलाचा गिबा पळून जात आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 त्यांनी घाट पार केला आहे व गिबा येथे मुक्काम केले आहे. रामा थरथर कापत आहे व शौलाचा गिबा पळून गेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 ते पुढे पलीकडे जातात आणि म्हणतात, “आम्ही गेबा येथे रात्रभर छावणी टाकू.” रामाह थरथर कापतो; शौलाचा गिबियाह पळून जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:29
18 Iomraidhean Croise  

आसाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याचा पराक्रम, त्याने जे काही केले ते व त्याने बांधलेली नगरे ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजाच्या बखरीत केले आहे, नाही काय? शेवटी वृद्धापकाळी त्याच्या पायांना काही विकार झाला.


परमेश्वर असे म्हणतो, “रामात शोक व आकांत ह्यांचा शब्द ऐकू येत आहे; राहेल आपल्या मुलांसाठी रडत आहे; आपल्या मुलांमुळे ती सांत्वन पावत नाही, कारण ती नाहीत.”


हे इस्राएला, गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळेपासून तू पाप करीत आला आहेस; तेथेच ते अद्यापि आहेत; गिबात दुष्कर्म्यांबरोबर झालेल्या लढाईत ते सापडले नाहीत.


गिबात शिंग फुंका, रामात कर्णा वाजवा; तुझ्यामागे, हे बन्यामिना! असा रणशब्द बेथ-आवेन येथे करा.


गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अति भ्रष्टाचार केला आहे; तो त्यांचा अधर्म स्मरतो; तो त्यांच्या पापांचे प्रतिफळ देतो.


बन्यामीन वंशाच्या वतनातून गिबोन व त्याचे गायरान, गेबा व त्याचे गायरान,


शौलही गिबा येथे आपल्या घरी गेला. ज्या सैनिकांच्या मनांस देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले.


मग जासुदांनी शौलाच्या गिब्यास जाऊन हे वर्तमान लोकांच्या कानांवर घातले; ते ऐकून सर्व लोक गळा काढून रडू लागले.


शौल, त्याचा पुत्र योनाथान व त्यांच्याबरोबर असलेले लोक बन्यामिनाचे गिबा येथे राहिले; पलिष्टी मिखमाश येथे तळ देऊन राहिले.


इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले.


नंतर पलिष्टी आपले ठाणे उठवून मिखमाशाच्या घाटात गेले.


शौल गिब्याच्या सीमेवर मिग्रोन येथील डाळिंबाच्या झाडाखाली राहत होता व त्याच्याबरोबर सुमारे सहाशे लोक होते;


ज्या घाटांनी योनाथान पलिष्ट्यांच्या छावणीकडे जाऊ पाहत होता त्यांच्या एका बाजूला एक व दुसर्‍या बाजूला एक असे दोन सुळके होते; एका सुळक्याचे नाव बोसेस व दुसर्‍याचे नाव सेने असे होते.


एक सुळका उत्तरेकडे मिखमाशासमोर व दुसरा दक्षिणेस गिब्यासमोर आहे.


मग शमुवेल रामा येथे गेला आणि शौल आपले नगर गिबा येथे स्वगृही गेला.


तो रामा येथे परत येत असे; कारण तेथे त्याचे घर होते. तेथे तो इस्राएलाचा न्यायनिवाडा करी; तेथे त्याने देवाप्रीत्यर्थ एक वेदी बांधली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan