Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्या दिवशी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जू निघेल” आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 त्या दिवशी, तुझ्या खाद्यांवरील त्याचे ओझे आणि तुझ्या मानेवरील त्याचे जूं काढण्यात येईल,” तुझ्या मानेच्या पुष्ठतेमुळे ते जू भंग पावेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 त्या दिवशी त्यांचे ओझे तुमच्या खांद्यावरून, त्यांचे जू तुमच्या मानेवरून काढून घेतले जाईल. तुमच्या खांद्यावरून जू तुटले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:27
28 Iomraidhean Croise  

गिलबोवाच्या डोंगरांनो, तुमच्यावर दहिवर न पडो, पर्जन्यवृष्टी न होवो नजराणा म्हणून देण्यास तुमच्यासाठी अर्पणयोग्य शेते न होवोत. कारण तेथे पराक्रम्यांची ढाल भ्रष्ट झाली आहे, शौलाची ढाल तैलाभ्यंगावाचून भ्रष्ट होऊन पडली आहे.


“माझ्या अभिषिक्तांना हात लावू नका, माझ्या संदेष्ट्यांना उपद्रव देऊ नका.”


तुझा सेवक दावीद ह्याच्याप्रीत्यर्थ तू आपल्या अभिषिक्ताचे तोंड मागे फिरवू नकोस.


तो म्हणेल, “मी आपल्या पवित्र सीयोन डोंगरावर आपला राजा अधिष्ठित केला आहे.”


परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो, हे मला आता कळून आले; तो आपल्या उजव्या हाताच्या उद्धारक प्रतापाची कृत्ये करून आपल्या पवित्र स्वर्गातून त्याचे ऐकेल.


तुला नीतिमत्त्वाची आवड व दुष्टाईचा वीट आहे; म्हणून देवाने, तुझ्या देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षदायी तेलाचा अभिषेक तुला केला आहे.


“मी त्याच्या खांद्यावरील भार काढला आहे; त्याच्या हातांतला हारा दूर केला आहे.


हे देवा, तू आमची ढाल आहेस; अवलोकन कर, तू आपल्या अभिषिक्ताच्या मुखाकडे दृष्टी लाव.


मी आपल्या देशात अश्शूरचा चुराडा करीन, माझ्या पर्वतांवर त्याला पायांखाली तुडवीन; तेव्हा त्याचे जूं त्यांच्यावरून निघेल, त्यांच्या खांद्यांवरून त्याचे ओझे उतरेल.”


तू भूमीत आपले बी पेरशील त्यावर तो पाऊस पाडील; भूमी पीक देईल ते अन्न रसभरीत व सत्त्वपूर्ण असेल; त्या काळी तुझी गुरेढोरे विस्तीर्ण कुरणात चरतील.


आपल्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी ह्या नगराचा बचाव होईल असे मी ह्याचे रक्षण करीन.”


अंगाची धूळ झाड; हे यरुशलेमे, उठून बस; सीयोनेच्या बंदिवान कन्ये, आपल्या गळ्याची बंधने सोडून टाक.


जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता? माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो.


कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.


सेनाधीश परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की मी तुझ्या मानेवरील त्यांचे जू मोडीन, तुझी बंधने तोडीन, ह्यापुढे परके तुझ्या लोकांकडून दास्य करवून घेणार नाहीत;


मिसर्‍यांनी घातलेले जोखड मी मोडून टाकीन व त्यांच्या पराक्रमाचा गर्व जिरेल तेव्हा तहपन्हेस येथे दिवस अंधकारमय होईल, ते अभ्राने आच्छादले जाईल. त्याच्या कन्या बंदिवान होऊन जातील.


याजक ह्या नात्याने परमेश्वराची सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे सादर करण्यात आले त्या दिवशी, परमेश्वराच्या हव्यांपैकी हा त्याचा व त्याच्या मुलांचा अभिषेकाचा वाटा ठरला आहे;


“परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास, [भग्नहृदयी जनांस बरे करण्यास] त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठवले आहे, ते अशासाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहेत त्यांना सोडवून पाठवावे;


त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “मशीहा (म्हणजे ख्रिस्त) आम्हांला सापडला आहे.”


कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले;


जो पवित्र पुरुष त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे, म्हणून तुम्हा सर्वांना ज्ञान आहे.


तुमच्याविषयी म्हणायचे तर त्याच्याकडून तुमचा जो अभिषेक झाला तो तुमच्यामध्ये राहतो, तेव्हा तुम्हांला कोणी शिकवण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक — तो सत्य आहे, खोटा नाही — तुम्हांला सर्व गोष्टींविषयी शिकवतो त्याप्रमाणे व त्याने तुम्हांला शिकवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये राहा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan