Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ओरेब खडकाजवळ मिद्यानाची कत्तल झाली तेव्हाच्याप्रमाणे सेनाधीश परमेश्वर त्यावर चाबूक चालवील; तो आपली काठी समुद्रावर लांबवील; ती तो मिसराप्रमाणे त्यावर उगारील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग सेनाधीश परमेश्वर त्यांच्यावर, मिद्यानाचा ओरेब खडकाजवळ पराभव आला त्याप्रमाणे, चाबूक चालवील, तो त्याची काठी समुद्रावर आणि मिसरात केल्याप्रमाणे उगारेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 सर्वसमर्थ याहवेह त्यांना चाबकाने फोडून काढतील, जसे त्यांनी मिद्यानाला ओरेबच्या खडकावर मारले होते; आणि ते त्यांची काठी पाण्यावर उंच करतील, जसे त्यांनी इजिप्तमध्ये केले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:26
21 Iomraidhean Croise  

त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातले एक लक्ष पंचाऐंशी हजार लोक मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


हे माझ्या देवा, हे माझ्या प्रभू, माझा न्यायनिवाडा व माझ्यासाठी वाद करावा म्हणून ऊठ, जागृत हो.


ओरेब व जेब ह्यांच्यासारखे त्यांच्या सरदारांना कर. जेबह व सलमुन्ना ह्यांच्यासारखे त्यांच्या सर्व अमिरांना कर.


तू आपली काठी उचलून आपला हात समुद्रावर उगार व त्याचे दोन भाग कर म्हणजे इस्राएल लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील;


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “हे माझे सीयोननिवासी प्रजे, अश्शूर मिसराप्रमाणे तुला दंडाने ताडन करील व तुझ्यावर सोटा उचलील, तरी त्याला भिऊ नकोस.


मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्राएलास जसा मार्ग झाला तसा त्याच्या अवशिष्ट लोकांना अश्शूरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल.


तेव्हा परमेश्वर आपला प्रतापी शब्द कानी पाडील, आणि आपल्या क्रोधाचे फुरफुरणे, भस्म करणार्‍या अग्नीची ज्वाला, मेघांचा गडगडाट आणि पर्जन्य व गारा ह्यांची वृष्टी ह्यांनी आपले भुजबल दाखवील.


कारण परमेश्वर आपल्या दंडाने ताडन करील तेव्हा त्याच्या वाणीने अश्शूर भयकंपित होईल;


आणि असे होईल की डफांचा व वीणांचा नाद होत असता परमेश्वर त्यांच्यावर नेमलेल्या दंडाचा प्रत्येक प्रहार करील व हात खालीवर करून त्यांच्याशी युद्ध करील.


तू राष्ट्राची वृद्धी केली आहेस; त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहेस, हंगामाच्या उत्सवसमयी करायच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणार्‍या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात.


कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.


‘राष्ट्रे क्रोधाविष्ट झाली,’ तुझ्या ‘क्रोधाची’ वेळ आली; मृतांचा न्याय करण्याची वेळ, आणि ‘तुझे दास संदेष्टे’ व तुझे पवित्र जन व तुझ्या नावाची भीती बाळगणारे लहानथोर ह्यांना वेतन देण्याची वेळ, आणि पृथ्वीची नासाडी करणार्‍यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.”


त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’


त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावांचे दोन सरदार पकडले; त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले व जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला; त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेपार गिदोनाकडे नेली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan