Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 अवशेष, याकोबाचा अवशेष, समर्थ देवाकडे परत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 याकोबाचा अवशेष समर्थ देवाकडे परत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 याकोबाचा राहिलेला प्रत्येकजणही परत येईल, सर्वसमर्थ परमेश्वराकडे परत येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:21
17 Iomraidhean Croise  

जो कोणी शेष राहिला असून एखाद्या ठिकाणी उपरा म्हणून राहत असेल, त्याला तेथल्या माणसांनी चांदी, सोने, सामानसुमान व पशू देऊन साहाय्य करावे; ह्याखेरीज यरुशलेमेतील देवाच्या मंदिराकरता त्यांनी स्वसंतोषाची अर्पणे द्यावीत.” पाडाव करून नेलेले यरुशलेमेस परत येतात


परमेश्वर मिसर देशास मारील; मारील व बरेही करील; ते परमेश्वराकडे वळतील आणि तो त्यांची विनंती ऐकेल व त्यांना बरे करील.


यहूदाच्या घराण्यातील निभावलेला अवशेष पुन्हा खाली मूळ धरील व वर फळ देईल.


“याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोकहो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले; उदरात होता तेव्हापासून तुम्हांला मी वागवले; माझे ऐका.


दुर्जन आपला मार्ग सोडो, अधर्मी आपल्या कल्पनांचा त्याग करो आणि परमेश्वराकडे वळो म्हणजे तो त्याच्यावर दया करील; तो आमच्या देवाकडे वळो, कारण तो त्याला भरपूर क्षमा करील.


“तो सीयोनेकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्यांच्याकडे उद्धारकर्ता म्हणून येईल,” असे परमेश्वर म्हणतो.


तेव्हा परमेश्वर यशयाला म्हणाला, “तू आपला पुत्र शआर-याशूब (अवशेष परत येईल) ह्याला बरोबर घेऊन वरच्या तळ्याचा नळ जेथे संपतो तेथे परटाच्या शेताच्या वाटेवर आहाजाला भेटायला जा;


तथापि लोक आपले ताडन करणार्‍यांकडे फिरत नाहीत, सेनाधीश परमेश्वराला शरण जात नाहीत.


कारण आमच्यासाठी बाळ जन्मला आहे, आम्हांला पुत्र दिला आहे; त्याच्या खांद्यांवर सत्ता राहील; त्याला “अद्भुत, मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती” म्हणतील.


त्या दिवसांत, त्या काळी, लोक इस्राएलाचे दुष्कर्म शोधतील, पण ते नसणार; यहूदाची पातके शोधतील पण त्यांना ती सापडायची नाहीत; कारण ज्यांना मी वाचवून ठेवीन त्यांना मी क्षमा करीन असे परमेश्वर म्हणतो.


हे इस्राएला, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ, कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस.


“चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ; कारण त्याने आम्हांला फाडले आहे, व तोच आम्हांला बरे करील; त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील.


इस्राएलाचे जो भूषण तो त्याच्यासमक्ष त्याच्याविरुद्ध साक्ष देतो; इतके असूनही परमेश्वर त्यांचा देव ह्याच्याकडे ते वळले नाहीत, त्याला शरण आले नाहीत.


ते परत येतात, पण परात्पराकडे नव्हे; ते फसवणार्‍या धनुष्यासारखे झाले आहेत; त्यांचे सरदार आपल्या जिव्हेच्या उद्दामपणामुळे तलवारीने पडतील; ह्यामुळे त्यांची मिसर देशात अप्रतिष्ठा होईल.


तर पहिल्याने दिमिष्कातील लोकांना व यरुशलेमेत, अवघ्या यहूदीया देशात व परराष्ट्रीय लोकांत मी उपदेश करत आलो की, पश्‍चात्ताप करा आणि पश्‍चात्तापास शोभतील अशी कृत्ये करून देवाकडे वळा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan