Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 त्या दिवशी असे होईल की इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, आपणांस ताडन करणार्‍याचा ह्यापुढे आश्रय धरून राहणार नाहीत; तर परमेश्वराचा, इस्राएलाच्या पवित्र प्रभूचा आश्रय ते खर्‍या मनाने करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 त्या दिवशी, इस्राएलाचा अवशेष, याकोबाच्या घराण्यातील बचावलेले, ज्यांनी त्यांना पराजीत केले त्यांचा आश्रय घेणार नाहीत, तर इस्राएलाचा जो पवित्र परमेश्वर याच्याकडे खरोखर येतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 त्या दिवशी इस्राएलचे अवशिष्ट, जिवंत राहिलेले याकोबाचे लोक, ज्याने त्यांना मारून टाकले त्याच्यावर यापुढे अवलंबून राहणार नाहीत, परंतु याहवेह, इस्राएलच्या पवित्र परमेश्वरावर ते खरोखरच भरवसा ठेवतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:20
25 Iomraidhean Croise  

मग आहाजाने अश्शूराचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याला जासुदांच्या हाती सांगून पाठवले की, “मी आपला सेवक, आपला मुलगा आहे, तर आता अरामाचा राजा व इस्राएलाचा राजा हे माझ्यावर चढाई करून आले आहेत. आपण येऊन त्यांच्या हातून माझा बचाव करा.”


कारण यरुशलेमेतून शेष निघेल व सीयोन डोंगरातून निभावलेले निघतील. परमेश्वराची आस्था हे सिद्धीस नेईल.


ह्या प्रसंगी आसाने आपला देव परमेश्वर ह्याची प्रार्थना केली की, “हे परमेश्वरा, सबलांच्या विरुद्ध निर्बलांचे साहाय्य करणारा तुझ्यावाचून अन्य कोणी नाही; हे आमच्या देवा, परमेश्वरा, आमचे साहाय्य कर; आमची भिस्त तुझ्यावर आहे; आम्ही तुझ्या नामावर भरवसा ठेवून ह्या समूहाशी सामना करण्यास आलो आहोत. हे परमेश्वरा, तू आमचा देव आहेस; मानवांचे तुझ्यावर वर्चस्व होऊ देऊ नकोस.”


त्या वेळेस आहाज राजाने अश्शूरच्या राजाकडे जासूद पाठवून कुमक मागितली.


ह्यामुळे अश्शूराचा राजा तिल्गथ-पिल्नेसर ह्याने त्याच्याकडे येऊन त्याला त्रस्त केले; त्याला साहाय्य केले नाही.


तर आम्ही पुन्हा तुझ्या आज्ञा मोडून अमंगळ कृत्ये करणार्‍या ह्या लोकांशी सोयरीक करावी काय? अशाने तू आमच्यावर कोपायमान होऊन आम्हांला भस्म करशील आणि आमचा कोणी अवशेष उरू देणार नाहीस, असे नाही का तू करणार?


सेनाधीश परमेश्वराने आमच्यासाठी यत्किंचित शेष राखून ठेवले नसते तर आम्ही सदोमासारखे झालो असतो, गमोर्‍याप्रमाणे बनलो असतो.


त्या दिवशी असे होईल की अश्शूर, मिसर, पथ्रोस, कूश, एलाम, शिनार, हमाथ व समुद्रतीरींचे प्रदेश येथून प्रभू आपल्या लोकांचा अवशेष आपल्या हाताने खरेदी करून दुसर्‍यांदा सोडवील.


मिसर देशातून निघण्याच्या वेळी इस्राएलास जसा मार्ग झाला तसा त्याच्या अवशिष्ट लोकांना अश्शूरातून निघून जाण्यास हमरस्ता होईल.


तुझा देव परमेश्वर कदाचित रब-शाके ह्याचे शब्द ऐकेल; त्याला त्याचा धनी अश्शूरचा राजा ह्याने जिवंत देवाचा उपमर्द करण्यास पाठवले आहे; आणि ते त्याचे शब्द ऐकून तुझा देव परमेश्वर त्यांचा निषेध करील; म्हणून जे काही शेष उरले आहे त्यांच्यासाठी तू रदबदली कर.”’


“याकोबाच्या घराण्या, इस्राएल घराण्यातील सर्व अवशिष्ट लोकहो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले; उदरात होता तेव्हापासून तुम्हांला मी वागवले; माझे ऐका.


परमेश्वराचे भय बाळगून त्याच्या सेवकाचे ऐकणारा असा तुमच्यामध्ये कोण आहे? जो अंधारात चालतो, ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा, आपल्या देवाचा आश्रय करावा.


त्यात लोकांचा दहावा हिस्सा राहिला तर त्याचाही नाश व्हायचा; तरी एला व अल्लोन ही झाडे तोडल्यावर ज्याप्रमाणे त्यांचा बुंधा राहतो त्याप्रमाणे त्यांचा बुडखा पवित्र बीज असा राहील.”2


टेकड्यांवरील शब्द, डोंगरांवरील गडबड खोटी ठरली आहे; खरोखर आमचा देव परमेश्वर ह्याच्या ठायी इस्राएलाचे तारण आहे.


यहूदाचे जे अवशिष्ट लोक यहूदा देशास परत जाण्याच्या आशेने मिसर देशात काही दिवस राहिले आहेत व स्वदेशी परत जाऊन राहण्याची फार अपेक्षा करीत आहेत त्यांतला कोणी निभावणार किंवा उरणार नाही. पळून जाणार्‍या लोकांखेरीज त्यांतला कोणीही परत जाणार नाही.”


अश्शूर आमचा बचाव करणार नाही, आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही, आमच्या हातच्या कृतीस, ‘आमच्या देवा,’ असे ह्यापुढे आम्ही म्हणणार नाही, कारण तुझ्याजवळ पोरक्यांना दया मिळते.


एफ्राइमाने आपला रोग पाहिला व यहूदाने आपली जखम पाहिली तेव्हा एफ्राईम अश्शूराकडे गेला व यारेब राजास त्याने निरोप पाठवला; पण त्याला तुम्हांला बरे करता येणार नाही, तुमची जखम बरी करता येणार नाही.


ह्यास्तव वेणा देणारी प्रसवेपर्यंत देव त्यांना परक्यांच्या अधीन करील; मग त्याचे अवशिष्ट बांधव इस्राएलाच्या वंशजांसह परत येतील.


इस्राएलाचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत, लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळायची नाही; ते चरतील व विश्रांती मिळवतील, कोणी त्यांना भेडसावणार नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan