Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ते दाद मागणार्‍या दुबळ्यांना धुडकावून लावतात व माझ्या प्रजेतल्या गरिबांचे हक्क बुडवतात; ते विधवांना लुटतात व पोरक्यांना नागवतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ते गरजूंना न्याय मिळू देत नाहीत आणि माझ्या लोकांतील गरिबांचे हक्क हिरावून घेतात, विधवांना लूटतात आणि पितृहीनांना आपले भक्ष्य करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 गरिबांचे हक्क हिरावून घेण्यासाठी आणि माझ्या लोकांपैकी पीडितांना न्यायापासून वंचित करण्यासाठी, विधवांना त्यांचे सावज बनविण्यासाठी आणि अनाथांना लुटण्यासाठी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:2
24 Iomraidhean Croise  

मी कंगालांचा आशाभंग केला असला, विधवेचे डोळे शिणवले असले,


ते विधवा व उपरे ह्यांचा जीव घेतात, अनाथांना ठार मारतात.


तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस.


गरीब हा केवळ गरीब आहे म्हणून त्याला नाडू नकोस. आणि वेशीत विपन्नावर जुलूम करू नकोस;


पृथ्वीवरून गरीब व मनुष्यांपैकी कंगाल ह्यांना खाऊन नाहीतसे करावे, असे तलवारींसारखे ज्यांचे दात व सुर्‍यांसारख्या ज्यांच्या दाढा, असा एक वर्ग आहे.


चांगले करण्यास शिका, नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा;1 अनाथाचा न्याय करा; विधवेचा कैवार घ्या.


तुझे सरदार बंडखोर व चोरांचे साथीदार झाले आहेत; त्यांतील प्रत्येकाला लाचांची आवड आहे. प्रत्येक जण नजराण्यांमागे लागणारा आहे; ते अनाथाचा न्याय करत नाहीत, विधवेची दाद घेत नाहीत.


ते नुसत्या शब्दावरून मनुष्याला दोषी ठरवतात, वेशीवरील स्पष्ट वक्त्यासाठी जाळे पसरतात व नीतिमानास धडधडीत लबाडीने उलथून पाडतात;


परमेश्वर आपल्या लोकांचे वडील व सरदार ह्यांचा निवाडा करील : “तुम्हीच द्राक्षीचा मळा खाऊन टाकला आहे; दीनांची लूट तुमच्या घरात आहे.


तुम्ही माझ्या लोकांना चिरडता, दीनांचे तोंड ठेचता, हे काय?” असे प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचे म्हणणे आहे.


भ्रष्टाचार करावा, परमेश्वराविरुद्ध पाखंड सांगावे, भुकेला जीव भुकेला ठेवावा, तान्हेल्यास प्यायला काही मिळू देऊ नये म्हणून मूर्ख मूर्खतेचे भाषण करतो, त्याचे मन अधर्म करते.


आणि जे लाच घेऊन दुष्कर्म करणार्‍यास निर्दोषी ठरवतात व नीतिमानाच्या निर्दोषीपणाची हानी करतात, त्यांना धिक्कार असो.


कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्राएलाचे घराणे; त्यातील त्याची आवडीची लागवड म्हणजे यहूदाचे लोक; त्याने न्याय्यत्वाची अपेक्षा केली तर अपहार, नीतिमत्तेची अपेक्षा केली तर आक्रोश आढळून आला.


सत्याचा अगदी अभाव झाला आहे; दुष्कर्मापासून दूर राहणारा बळी पडतो. परमेश्वराने हे पाहिले व न्याय नाही म्हणून त्याची इतराजी झाली.


परका, पोरका व विधवा ह्यांना जाचणार नाही, ह्या स्थळी निर्दोष रक्त पाडणार नाही आणि अन्य दैवतांचे अनुसरण करून आपली हानी करून घेणार नाही,


परात्पराच्या समक्ष मनुष्याचे हक्क बुडवणे,


तुझ्या ठायी लोक आईबापांना तुच्छ मानतात, तुझ्या ठायी ते परदेशीयांवर जुलूम करतात, तुझ्या ठायी ते अनाथ व विधवा ह्यांना जाचतात.


परमेश्वर म्हणतो, “इस्राएलाचे तीन काय पण चार अपराध झाले, म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही; कारण ते रुप्यासाठी नीतिमानास विकतात, एका जोड्यासाठी गरिबास विकतात;


ते गरिबांची मस्तके धुळीत लोळवतात, ते दीनांच्या मार्गात आडवे येतात, माझ्या पवित्र नामास बट्टा लावण्याकरता मुलगा व बाप एकाच तरुणीकडे जातात.


एखादा मनुष्य सिंहापासून पळतो तर त्याला अस्वल गाठते, तो घरात येऊन भिंतीला हात टेकतो तर त्याला सर्प दंश करतो, तसा हा प्रकार आहे.


मी म्हणालो, याकोबाच्या प्रमुखांनो, इस्राएल घराण्याच्या सरदारांनो, ऐका, न्यायाची जाणीव तुम्हांला नसावी काय?


मी न्याय करायला तुमच्याकडे येईन; आणि जादूगार, व्यभिचारी, खोटे साक्षी ह्यांच्याविरुद्ध आणि मजुरांची मजुरी अडकवून ठेवणारे, विधवा व अनाथ ह्यांच्यावर जुलूम करणारे, आणि मला न भिता परक्याला न्याय मिळू न देणारे ह्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याची मी त्वरा करीन.


अहो शास्त्र्यांनो, अहो परूश्यांनो, ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही लोकांना स्वर्गाचे राज्य बंद करता; तुम्ही स्वतःही आत जात नाही व आत जाणार्‍यांनाही आत जाऊ देत नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan