Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तो त्याच्या वनोपवनांचा देह व आत्मा ह्यांची शोभा नष्ट करील. रोगी क्षीण होत जातो त्याप्रमाणे त्याची स्थिती होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 परमेश्वर त्याचे रान व सुपीक भूमी यांची शोभा त्यांच्या देह व आत्मा या दोहोसहीत फस्त करील; जेव्हा रोगी मनुष्य खंगत जातो त्याप्रमाणे हे होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 ज्याप्रकारे एखादा रोगी क्षय पावतो त्याप्रकारे त्याच्या जंगलांचे आणि सुपीक शेत जमिनींचे वैभव, ते पूर्णपणे नष्ट करतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:18
10 Iomraidhean Croise  

तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, ‘मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


माझ्यावरच्या तुझ्या संतापामुळे व माझ्या कानावर आलेल्या तुझ्या उन्मत्तपणामुळे मी तुझ्या नाकात वेसण व तुझ्या तोंडात लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.


ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.


पण वनाचा नाश होतेवेळी गारा पडतील व शहर निखालस जमीनदोस्त करण्यात येईल.


तू आपल्या सेवकांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास मी आपल्या बहुत रथांनिशी पर्वतांच्या माथ्यावर, लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे; मी त्याचे उंच गंधसरू व निवडक देवदारू तोडून टाकीन; त्याच्या अत्यंत दूरच्या उच्च स्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करीन.


दुष्टता अग्नीसारखी पेट घेते; ती काटेकुटे व काटेझुडपे खाऊन टाकते; वनातील झाडीतही ती पेट घेते; त्यांच्या धुराचा लोळ वर चढतो.


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


त्या दिवशी मी यहूदाच्या सरदारांना लाकडाखालच्या आगटीसारखे, पेंढ्याखालच्या जळत्या मशालीसारखे करीन; ते उजवीकडील व डावीकडील सभोवतालच्या सर्व राष्ट्रांना खाऊन टाकतील; यरुशलेम आपल्या पूर्वीच्या जागी म्हणजे यरुशलेमेच्या जागी पुन्हा वसेल.


Lean sinn:

Sanasan


Sanasan