Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 ह्यास्तव प्रभू, सेनाधीश प्रभू, त्याच्या पुष्ट जनांना रोडपणा आणील; त्याच्या वैभवाखाली, अग्निज्वालेसारखी ज्वाला भडकेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 म्हणून सैन्याचा परमेश्वर प्रभू त्याच्या शूर योद्ध्यांमध्ये कमजोरी पाठवील; आणि त्याच्या गौरवाच्या प्रभावाने अग्नी सारखी ज्वाला पेटेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 म्हणून, प्रभू, सर्वसमर्थ याहवेह, त्याच्या दणकट योद्ध्यांवर विनाशकारी रोग पाठवतील; त्यांच्या ऐश्वर्यात धगधगत्या ज्योतीसारखा अग्नी प्रज्वलित केला जाईल अग्नी प्रज्वलित केला जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:16
25 Iomraidhean Croise  

मग परमेश्वराने एक दूत पाठवला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूर वीर, प्रमुख व नायक ह्यांची कत्तल केली; तेव्हा तो फजीत होऊन आपल्या देशास परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकले.


तेव्हा त्याने त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांना दिले, पण त्यांचा जीव झुरणीस लावला.


तोच त्यांच्यावर देवाचा कोप भडकला, आणि त्याने त्यांच्यातल्या धष्टपुष्टांस मारून टाकले, इस्राएलाच्या तरुणांना ठोकून खाली पाडले,


तो त्याच्या वनोपवनांचा देह व आत्मा ह्यांची शोभा नष्ट करील. रोगी क्षीण होत जातो त्याप्रमाणे त्याची स्थिती होईल.


त्या दिवशी असे होईल की याकोबाचे वैभव क्षय पावेल, त्याचा पुष्ट देह रोड होईल.


हे परमेश्वरा, तुझा हात वर झाला तरी त्यांनी पाहिले नाही. लोकांविषयीची तुझी आस्था पाहून ते फजीत होतील; अग्नी तुझ्या शत्रूंना ग्रासील.


त्याचे अधिपती भयाने पळून जातील व त्याचे सरदार झेंडा पाहून घाबरतील;” ज्याचा अग्नी सीयोनेत आहे व ज्याची भट्टी यरुशलेमेत आहे, तो परमेश्वर असे म्हणतो.


माझ्यावरल्या तुझ्या संतापामुळे व तुझा उन्मत्तपणा माझ्या कानावर आल्यामुळे मी तुझ्या नाकात माझी वेसण व तुझ्या तोंडात माझा लगाम घालून ज्या वाटेने तू आलास तिनेच तुला परत लावीन.’


मग परमेश्वराच्या दिव्यदूताने जाऊन अश्शूरी गोटातल्या एक लक्ष पंचाऐंशी हजार लोकांना मारले; पहाटेस लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतेच प्रेते!


येथे कोकरे आपले कुरण समजून चरतील, धष्टपुष्टांच्या ओसाड झालेल्या जागा परके खाऊन टाकतील.


ह्यास्तव प्रभू त्यांच्यावर फरात नदाच्या जलाचा प्रबल व विपुल ओघ म्हणजे अश्शूरचा राजा ह्याचा सर्व दळभार आणील; तो आपली सर्व पात्रे व तीर भरून वाहील;


कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे, तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणार्‍याचा सोटा मोडला आहेस.


युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.


परमेश्वर म्हणतो, तुमच्या करणीच्या फळाप्रमाणे मी तुमचा समाचार घेईन; तिच्या वनात मी अग्नी पेटवीन, तो तिच्या आसपासचे सगळे भस्म करील.”


‘आम्ही वीर आहोत, युद्धाच्या कामी शूर आहोत,’ असे तुम्ही का म्हणता?


मी हरवलेल्यांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना शोधीन, हाकून दिलेल्यांना परत आणीन, घायाळांना पट्टी बांधीन, रोग्यांना बळ देईन; पण लठ्ठ व बलिष्ठ ह्यांचा मी नाश करीन; त्यांना मी यथान्याय चारीन.


परमेश्वर म्हणतो, “ते मजबूत व असंख्य असले, तरी त्यांचा उच्छेद होऊन ते नाहीतसे होतील. मी तुला पिडले, पण आता पुढे पिडणार नाही.


तो उत्तरेवर आपला हात चालवून अश्शूराचा नाश करील; निनवे वैराण रानाप्रमाणे रुक्ष करील.


मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की,


त्याने देवाचा गौरव केला नाही, म्हणून तत्क्षणी प्रभूच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला आणि तो किडे पडून मेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan