यशायाह 10:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 कुर्हाडीने तोडणार्यापुढे कुर्हाड घमेंड करील काय? करवत आपणास चालवणार्यापुढे आढ्यता मिरवील काय?सोट्याने आपणास हाती धरणार्यास गरगर फिरवावे, काष्ठाने काष्ठेतरास उचलावे तसे हे आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जो कुर्हाड फिरवितो त्याच्यावरच कुऱ्हाड उठते काय, किंवा करवतीचा जो वापर करतो त्याच्याचविरुद्ध ती बढाई मारते काय? जसे एखादा व्यक्ती जी काठी उचलतो तीच त्याच्यावर उगारते काय, किंवा जे लाकूड नाही, त्याला धमकावण्यासाठी जड काठी हवेत फिरते काय! Faic an caibideil |