Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 10:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 पक्ष्याच्या कोट्याप्रमाणे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे; पक्ष्यांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे सर्व पृथ्वी मी हस्तगत केली आहे; तेव्हा कोणी पंख फडफडवले नाहीत, तोंड उघडले नाही, चिवचिव केली नाही,”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 पक्षाच्या घरट्यातून मिळावे तसे राष्ट्रांचे धन माझ्या हाती लागले आहे, व पक्षांनी टाकून दिलेली अंडी कोणी गोळा करतो त्याप्रमाणे मी सर्व पृथ्वी एकवट केली आहे. कोणी त्यांच्या पंखाची फडफड केली नाही किंवा तोंड उघडले नाही की चिवचिव केली नाही.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 जसा कोणी घरट्यात पोहोचतो, तसेच राष्ट्रांच्या संपत्तीसाठी माझा हात पोहोचला. जसे लोक सोडून दिलेली अंडी गोळा करतात, तसे मी सर्व देशांना एकत्र केले; कोणीही पंख फडफडविला नाही, किंवा किलबिल करण्यासाठी तोंड उघडले नाही.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 10:14
14 Iomraidhean Croise  

मी व माझ्या वडिलांनी देशोदेशीच्या सर्व लोकांचे काय केले हे तुम्हांला ठाऊक नाही काय? आपला देश माझ्या हातून सोडवण्यास देशोदेशींच्या राष्ट्रांचे कोणी देव समर्थ झालेत का?


जर माझे धन बहुत आहे, माझ्या हातांनी फार कमाई केली आहे, ह्याचा मी आनंद केला असता,


नाशापूर्वी मनुष्याचे अंत:करण गर्विष्ठ असते; आधी नम्रता मग मान्यता.


मी जमीन खणून पाणी प्यालो; माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसर देशाचे सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकीन.


जे घराशी घर व शेताशी शेत जोडून घेतात, जागा मुळीच उरू देत नाहीत, त्यांना धिक्कार असो; तुमचीच काय ती देशात वस्ती आहे असे झाले आहे.


जी तू कड्याच्या कपारीत राहतेस, टेकडीच्या माथ्याचा आश्रय करून बसतेस, त्या तुला तुझ्या विक्राळपणाने, तुझ्या मनाच्या गर्वाने फसवले आहे; तू आपले कोटे गरुडाप्रमाणे उंच ठिकाणी केले असले तरी तेथून मी तुला खाली आणीन, असे परमेश्वर म्हणतो.


ह्या प्रकारे तुम्ही आपल्या तोंडाने माझ्याविरुद्ध आपली थोरवी मिरवलीत, माझ्याविरुद्ध हवे तितके बोललात; ते मी ऐकले आहे.


तू गरुडाप्रमाणे आपले घरटे उंच केलेस, तुझे घरटे तार्‍यांमध्ये बांधलेस, तरी मी तुला तेथून ओढून खाली पाडीन, असे परमेश्वर म्हणतो.


चांदी लुटा! सोने लुटा! सर्व तर्‍हेच्या शोभिवंत वस्तूंचा अमर्याद संग्रह आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan