Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




यशायाह 1:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मी आपला हात तुला लावून क्षार घातल्यासारखा तुझे कीट गाळून नाहीसे करीन, तुझ्यातील सर्व शिसे काढून टाकीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 मी तुजविरूद्ध आपला हात वळवून, तुझे शुद्धीकरण करून तुझ्यातील निरुपयोगी गोष्टी काढून सर्व प्रकारची अशुद्धता दूर करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 मी माझा हात तुमच्याविरुद्ध उचलेन; मी तुमची सर्व मलिनता पूर्णपणे काढून टाकेन आणि तुमची सर्व अशुद्धता काढून दोषरहित करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




यशायाह 1:25
18 Iomraidhean Croise  

पृथ्वीवरील सर्व दुर्जनांस तू गाळासारखे दूर करतोस; म्हणून तुझे निर्बंध मला प्रिय आहेत.


तुझे रुपे कीट झाले आहे; तुझ्या द्राक्षारसात पाणी मिसळले आहे.


अशा रीतीने याकोबाच्या दोषांचे क्षालन होईल; त्याचे पाप दूर केल्याचे फळ हेच आहे; तो वेद्यांचे सर्व चिरे फुटलेल्या चुनखड्यासारखे करील तेव्हा अशेरामूर्ती व सूर्यमूर्ती पुन्हा उभारणार नाहीत.


प्रभू न्याय करणार्‍या व दहन करणार्‍या आत्म्याच्या द्वारे सीयोनेच्या कन्यांचा मळ काढून टाकील, आणि यरुशलेमेतून तिचा रक्तदोष काढून टाकील, तेव्हा असे घडेल.


भाता फुंक फुंक फुंकला आहे, शिसे जळून खाक झाले आहे; ते गाळून गाळून थकले आहेत, तरी दुष्टांची छाननी काही झाली नाही.


कपटाने घेरलेली अशी तुझी वस्ती आहे; कपटामुळे ते मला ओळखण्यास अमान्य आहेत, असे परमेश्वर म्हणतो.


ह्यासाठी सेनाधीश परमेश्वर म्हणतो, “पाहा, मी त्यांना गाळून पारखीन; माझ्या लोकांच्या कन्येच्या वर्तनास्तव मी दुसरे काय करणार?


बंडखोर व माझ्याबरोबर फितुरी करणारे ह्यांना मी तुमच्यापासून वेगळे करीन; ते अल्पकाळ वस्ती करून आहेत त्या देशांतून त्यांना बाहेर नेईन; पण इस्राएल देशात त्यांचे येणे होणार नाही, म्हणजे तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे.


ह्यास्तव प्रभू परमेश्वर म्हणतो, तुम्ही सर्व गाळ झाला आहात; म्हणून पाहा, मी तुम्हांला यरुशलेमेत एकत्र करीन.


रुपे, पितळ, लोखंड, शिसे व कथील लोक भट्टीत घालतात व ती वितळण्यासाठी अग्नी फुंकून प्रदीप्त करतात त्याप्रमाणे मी आपल्या क्रोधाने व संतापाने तुम्हांला जमा करीन व भट्टीत घालून वितळवीन.


रुपे भट्टीत वितळते तसे तुम्ही यरुशलेमेत वितळून जाल, तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वराने आपला संताप तुमच्यावर ओतला आहे.”


ज्या ज्या बाबतीत तू माझ्याविरुद्ध उल्लंघन करावेस त्याविषयी त्या दिवसांत तुला लज्जित होण्याचे कारण पडणार नाही; कारण तेव्हा मी तुझ्या उन्नतीचा अभिमान धरणार्‍यांना तुझ्यातून नाहीतसे करीन; माझ्या पवित्र पर्वतावर तू ह्यापुढे तोरा मिरवणार नाहीस.


रुपे गाळून शुद्ध करणार्‍यासारखा तो बसेल, व लेवीच्या वंशजांना शुद्ध करील; त्यांना सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते नीतिमत्तेने परमेश्वराला बली अर्पण करतील.


त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझत्या अग्नीने जाळून टाकील.”


राष्ट्रांनो, त्याच्या प्रजेचा जयजयकार करा; कारण तो आपल्या सेवकांच्या रक्तपाताचा बदला घेईल, तो आपल्या विरोधकांचा सूड उगवील, तो आपला देश व आपली प्रजा ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करील.”


‘जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो;’ म्हणून आस्था बाळग आणि पश्‍चात्ताप कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan